उपराजधानीत चार ठिकाणी ‘पे अॅन्ड पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:03 AM2017-10-06T01:03:30+5:302017-10-06T01:03:41+5:30
शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नवीन पार्किं ग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नवीन पार्किं ग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरात चार ठिकाणी पे अॅन्ड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पार्किं गसाठी वाहनधारकांना २ ते २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच वाहनधारकांसाठी मासिक पार्किं ग शुल्कचीही सुविधा उपलब्ध राहणार असल्याने, नोकरीनिमित्त दररोज येणाºयांवरील शुल्काचा भार कमी होणार आहे.
गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवीन पार्किं ग धोरणाला महापालिका सभागृहाने मान्यता दिली होती. याची वर्षभरानंतर अंमलबजावणी होत आहे. परंतु पहिल्या टप्प्यात केवळ चार ठिकाणीच पे अॅन्ड पार्कचा निर्णय घेण्यात आला. यात पंचशील चौक ते लोकमत चौक उड्डाणपुलाच्या खाली दुचाकी तर याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी, यशवंत स्टेडियम परिसरात चार व दुचाकी, राहाटे कॉलनीत पे अॅन्ड पार्क सुरू करण्यात आला आहे.
जून महिन्यात सभागृहात पार्किं गचे दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी सायकल, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी व व्यावसायिक वाहनांसाठी पार्किं गचे दर निश्चित केले आहे. किमान २ ते २० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठाने असून, तेथे कर्मचारीही काम करतात. व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मालक व तेथील कर्मचाºयांवर वाहन ठेवण्यासाठी दररोजच्या शुल्काचा बोजा पडू नये, यासाठी मासिक पार्किं ग शुल्काची सुविधा आहे. चारचाकी वाहनांसाठी २५० रुपये मासिक तर दुचाकी वाहनांसाठी १०० रुपये मासिक शुल्क आकारले जाणार आहे.
पे अॅन्ड पार्कमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय वाहनधारकांनाही दोन ते आठ तासांसाठी वाहनांकरिता हक्काची जागा मिळणार आहे. मेट्रो रेल कॉरिडॉर, हाय वे, कमर्शियल एरिया, कोर सिटी एरिया सदर, सीताबर्डी, इतवारी, महाल, लकडगंज, महाल, धरमपेठ, काँग्रेसनगर, गणेशपेठ येथेही टप्प्याटप्प्याने सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय इतर रहिवासी आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेनुसार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येथे दर तासाप्रमाणे तसेच आॅफ स्ट्रीट आणि आॅन स्ट्रीट पार्किं गचे दरही ठरविण्यात येणार आहे.