उपराजधानीतील बंदोबस्त कडक

By admin | Published: December 28, 2015 03:27 AM2015-12-28T03:27:02+5:302015-12-28T03:27:02+5:30

इसिसच्या कॅम्पकडे निघालेल्या हैदरबादच्या तीन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून

Sub-settlement settlement | उपराजधानीतील बंदोबस्त कडक

उपराजधानीतील बंदोबस्त कडक

Next

नागपूर : इसिसच्या कॅम्पकडे निघालेल्या हैदरबादच्या तीन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे येथील संघ मुख्यालय, दीक्षभूमी, विमानतळ, विधानभवन रेल्वेस्थानकासह अनेक ठिकाणी नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आधीपासूनच तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
अशात इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या अब्दुल बासित मोहम्मद आरिफ (वय २१, रा. नसीबनगर, हैदराबाद), सय्यद ओमर फारुख हुसेन (२२, गुलशन इक्बाल कॉलनी, हैदराबाद) आणि माज हसन फारुख (२१, मुस्कान हयात हुमायुनगर) या तिघांना येथील विमानतळावर शनिवारी पहाटे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि हैदराबाद काऊंटर इंटेलिजन्स टीम(सीआयटी)ने ताब्यात घेतले. या तिघांनी नागपुरातील अनेक संवेदनशील स्थळांची रेकी केल्याचा पक्का संशय असल्यामुळे उपरोक्त स्थळांसह विविध मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sub-settlement settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.