उपराजधानीत प्रदूषणाचा ‘बॉम्ब’
By admin | Published: November 1, 2016 02:36 AM2016-11-01T02:36:10+5:302016-11-01T02:36:10+5:30
सध्या दिवाळी उत्सव सुरू असून, सर्वत्र फटाके फोडले जात आहे. यात रविवारी लक्ष्मीपूजन झाले, अन्
सदर, धरमपेठ परिसरात सर्वाधिक फटाके फुटले :
घसा व श्वासाचा त्रास वाढण्याची भीती
नागपूर : सध्या दिवाळी उत्सव सुरू असून, सर्वत्र फटाके फोडले जात आहे. यात रविवारी लक्ष्मीपूजन झाले, अन् उपराजधानीत अक्षरश: प्रदूषणाचा बॉम्बच फुटला. रात्री ७ ते १० वाजता दरम्यान संपूर्ण वातावरणात फटाक्यांचा धूर पसरला होता. यातून शहरात प्रचंड ध्वनी आणि वायुप्रदूषण झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळी उत्सवातील या प्रदूषणाचे नियमित मॉनिटरिंग केले जात असून, रविवारी रात्री सामान्य प्रदूषणाच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उप विभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात ठिकठिकाणी प्रदूषणाची अचूक नोंद करण्यासाठी नॉईस व एअर मॉनिटरिंग मशीन्स सज्ज केल्या आहेत. या मशीन्सच्या माध्यमातून दिवाळी उत्सवात होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची आकडेवारी गोळा केली जात आहे.
रविवारी शहरातील सर्वांत पॉश समजल्या जाणाऱ्या सदर आणि धरमपेठ परिसरात सर्वाधिक फटाके फुटल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे या दोन्ही परिसरात सर्वाधिक प्रदूषण झाले आहे.