उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:11 PM2020-08-04T21:11:16+5:302020-08-04T22:12:44+5:30

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Subcapital Ayodhyamaya: In the evening lighting, lights will be luminated in every house | उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार

उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार

Next
ठळक मुद्देराममंदिर भूमिपूजनप्रसंगी जागोजागी आनंदोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कुठे ‘रामधून’ वाजविण्यात येणार आहे, तर कुठे भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येलाच नागपुरातील विविध चौकात वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’च्या संसर्गामुळे मंदिरे बंद असली तरी सायंकाळी बहुतांश महत्त्वाच्या मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे.


रामजन्मभूमीच्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली. संघ मुख्यालय असल्यामुळे स्वयंसेवकांमध्ये जास्त उत्साह दिसून येत आहे. विविध स्वयंसेवी संघटनांकडून शहरातील विविध ठिकाणी सकाळपासूनच रामरक्षा, हनुमान चालिसा, श्रीराम जयरामचा जयघोष, पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी सूर्यास्त होताच घरोघरी दीप उजळले जाणार असल्याने बुधवारी दिवाळीसदृश चित्र दिसणार आहे. नागपुरातील विविध चौकात श्रीराम पोस्टर्सदेखील लावण्यात आले आहेत.


नागरिकांकडूनदेखील पुढाकार
अनेक उत्साही नागरिकांनी तर मंदिरांसोबतच स्वत:च्या घरावरदेखील रोषणाई केली आहे. सकाळपासूनच घरांमध्ये ‘रामधून’ वाजविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळा
विहिंपतर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. तर संघाकडून कुठलाही अधिकृत कार्यक्रम नसला तरी शाखानिहाय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यादरम्यान नागरिकांनी अतिउत्साह न दाखवता ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

‘सोशल मीडिया’ राममय
मंगळवारी ‘सोशल मीडिया’वरदेखील राममंदिर भूमिपूजनाचीच चर्चा दिसून आली. प्रोफाईल पिक्चर्समध्ये अनेकांनी राममंदिराची छबी असलेले छायाचित्र ‘अपलोड’ केले आहेत. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे काही महिला मंडळांनी ‘आॅनलाईन’ रामरक्षा पठनाचे आयोजन केले आहे.

भाजपाकडूनदेखील तयारी

बुधवारी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाजपतर्फे चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनाच्या निमित्ताने नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी रामपूजन करतील; सोबतच प्रसाद वितरण, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात येईल. मोठ्या चौकात आतषबाजी करण्यात येईल व सायंकाळी परिसरातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात येईल. नागरिकांनीदेखील सायंकाळी घरासमोर दिवे लावून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व नागपुरात ५०० किलो लाडूचे वितरण करण्यात येईल.

Web Title: Subcapital Ayodhyamaya: In the evening lighting, lights will be luminated in every house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.