परदेशी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:54+5:302021-06-29T04:06:54+5:30
नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात ...
नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅंकमध्ये परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू.महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करावा. व हा अर्ज एस.डब्ल्यू.एफ.एस. ॲप्लिकेशनस.२१२२ ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर पाठवावा. त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, पुणे या पत्त्यावर पाठविण्यात यावी.
या योजनेच्या अटी व शर्ती व लाभाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच अनुज्ञेय राहील. अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीसाठी डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू.महाराष्ट्र डॉ. जीओव्ही डॉ. इन या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.