जात पडताळणीचे अर्ज आपआपल्या महाविद्यालयातच सादर करा; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

By आनंद डेकाटे | Published: September 17, 2022 06:17 PM2022-09-17T18:17:57+5:302022-09-17T18:19:04+5:30

३८४ महाविद्यालयासाठी महत्त्वाची सूचना

Submit caste verification application to your college only; Appeal of District Caste Certificate Verification Committee | जात पडताळणीचे अर्ज आपआपल्या महाविद्यालयातच सादर करा; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

जात पडताळणीचे अर्ज आपआपल्या महाविद्यालयातच सादर करा; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

googlenewsNext

नागपूर : ३८४ महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. यात त्यांना जात पडताळणी अर्ज परिपूर्ण स्थितीत कसे स्विकारावे, त्रृटी कशी पूर्ण करावी, याबाबतचे प्रशिक्षण मिळाले आहे. त्यामुळे बारावीत असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी केले आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच स्विकारण्यात येईल. याबाबत वेळोवेळी नागपूर जिल्हयातील ३८४ महाविद्यालयांना कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. महाविद्यालयातील नोडल अधिकारी तसेच संबंधित कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी रोड, नागपूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेपासून ते विद्यार्थ्यांचा परीपूर्ण अर्ज कार्यालयात कसा सादर करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत महाविद्यालयातच अर्ज करावे.

या कार्यशाळेत समितीचे अध्यक्ष सचित कलंत्रे, सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, श्रीमती आशा कवाडे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांचेकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १२ विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज महाविद्यालयात सादर करावे. तसेच १२ वी परिक्षा उत्तीर्ण झालेले आणि सीईटी, नीट इत्यादीमध्ये ज्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यांनी तत्काळ अर्ज समिती कार्यालयात करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी केले आहे.

Web Title: Submit caste verification application to your college only; Appeal of District Caste Certificate Verification Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.