दिवाळीपूर्वी आरोग्य सेवकांची माहिती सादर करा : आयुक्तांचे खासगी रुग्णालयांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:48 PM2020-11-10T23:48:48+5:302020-11-10T23:50:20+5:30

NMC Commissioner's instructions to private hospitals खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या आरोग्य सेवकांची माहिती विहित नमुन्यात सादर  केली नाही ती दिवाळीपूर्वी सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.

Submit information of health workers before Diwali: Commissioner's instructions to private hospitals | दिवाळीपूर्वी आरोग्य सेवकांची माहिती सादर करा : आयुक्तांचे खासगी रुग्णालयांना निर्देश

दिवाळीपूर्वी आरोग्य सेवकांची माहिती सादर करा : आयुक्तांचे खासगी रुग्णालयांना निर्देश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ नियंत्रणासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. ही लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी त्याचा डेटाबेस तयार करण्याचे काम महापालिकेद्वारे सुरू आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. तरीसुद्धा अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या आरोग्य सेवकांची माहिती विहित नमुन्यात सादर  केली नाही ती दिवाळीपूर्वी सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.

नागपुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला पाठवावयाची आहे. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती मनपाकडे विहीत नमुन्यात सादर करावयाची असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी कॉपोर्रेट हॉस्पिटल, खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनीसुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे.

४६० रुग्णालयांनी महिती दिली नाही

आतापर्यंत ६४० रुग्णालयामधून फक्त १८० रुग्णालयांनी ९५५० कर्मचाऱ्यांचा डेटा दिला आहे. ४६० रुग्णालयांनी अद्याप माहिती सादर केली नाही. माहिती वेळेवर दिल्या गेली नाही तर उरलेल्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस मिळण्यात विलंब होऊ शकतो. विभागीय आयुक्तांनीसुद्धा ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमाने डॉक्टर्स संघटनांशी चर्चा करून त्यांना आरोग्य सेवकांची माहिती सादर करण्याबाबत सांगितले होते. आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी पॅथीच्या डॉक्टरांनीसुद्धा माहिती सादर करावयाची आहे.

Web Title: Submit information of health workers before Diwali: Commissioner's instructions to private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.