अपयशाचे पुस्तक वाचल्यावरच यश

By admin | Published: February 1, 2016 02:54 AM2016-02-01T02:54:01+5:302016-02-01T02:54:01+5:30

लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.

Success after reading the book of failure | अपयशाचे पुस्तक वाचल्यावरच यश

अपयशाचे पुस्तक वाचल्यावरच यश

Next

स्कील डेव्हलपमेंट : आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांची तरुणांना साद
नागपूर : लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. अपयश हे संपूर्ण पुस्तक आहे. ज्याच्या शेवटच्या पानावर यश लिहिलेले आहे आणि ते वाचायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचावेच लागेल, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांनी रविवारी तरुणांना साद घातली.
निमित्त होते. फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने मानकापूर येथील क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये आयोजित मार्गदर्शनपर सत्राची. ‘स्कील डेव्हलपमेंट भावी काळाजी गरज’ या विषयावर मार्गदर्शन करताना सचिन बुरघाटे यांनी आपल्या अनोख्या शैलीने उदाहरणे सादर करीत तरुणांची मने जिंकली. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाची सुरुवात त्यांनी एका उदाहरणाने केली. त्यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयाची मी नवीन इमारत बांधली. तेव्हा अनेक लोक दूरवरून येत होते. त्या इमारतीची खूप प्रशंसा करायचे. परंतु सर्वात जास्त प्रशंसा ही इमारतीच्या फ्लोअर गाईडची करायचे आजही त्याचे तितकेच कौतुक केले जाते. परंतु ते काम त्याच व्यक्तीकडून करून घेण्यासाठी मी अनेक दिवस वाट पाहिली. त्याच्याकडे वेळ नव्हता. अनेक जण म्हणायचे की दुसऱ्याकडून काम करवून घ्या. परंतु मला जे काम करायचे होते, ते तीच व्यक्ती चांगले करू शकेल, याची मला पूर्ण खात्री होती. काम झाल्यावर ते सिद्ध झाले. यालाच कौशल्य म्हणजे स्कील असे म्हणतात. कुठलेही क्षेत्र असो किंवा काम असो, त्यात मास्टरकी असणे म्हणजेच स्कील आहे. जे कार्य कराल ते चांगले करा, यश नक्कीच मिळेल.
एक-दोन अपयश नव्हे तर अनेक अपयशानंतर यश प्राप्त होत असते, असे स्पष्ट करीत यासंदर्भात अनेक उदाहरणे सादर करीत अपयशाला घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले. याच विषयावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी अभ्यास, सराव, परिश्रम, शिस्त आणि लॉजिक यावर भर देण्यास सांगितले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इंडस्ट्राईजेशन(एमगीरी)चे संचालक प्रफुल्ल काळे यांनी एमगीरीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणपर अभ्यासक्रमाची माहिती सादर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Success after reading the book of failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.