मधमाशा अभ्यासातून मधनिर्मिती व्यवसायाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:53+5:302021-05-20T04:07:53+5:30

जागतिक मधमाशी संवर्धन दिन निशांत वानखेडे नागपूर : मधमाशांबद्दलचे कुतूहल मनात असताना त्यांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांना ...

Success of beekeeping business from bee study | मधमाशा अभ्यासातून मधनिर्मिती व्यवसायाचे यश

मधमाशा अभ्यासातून मधनिर्मिती व्यवसायाचे यश

Next

जागतिक मधमाशी संवर्धन दिन

निशांत वानखेडे

नागपूर : मधमाशांबद्दलचे कुतूहल मनात असताना त्यांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांना होती. या कुतूहलामुळे त्यांना मधमाशांच्या अभ्यासाकडे वळविले. हा अभ्यास करताना मधमाशांच्या संवर्धनाचे पाऊल त्यांनी उचलले आणि पुढे हाच त्यांचा व्यवसाय झाला. एका मोठ्या आयटी कंपनीची नोकरी सोडून मधमाशा पालनाच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या अभियंता प्रणव निंबाळकरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे पण त्यांच्या मते हा निसर्गाकडे घेऊन जाणारा समाधानकारक प्रवास आहे.

मधमाशांचे अस्तित्व आज संकटात आले आहे. असे चित्र असताना निसर्गाबद्दल आपुलकी असलेली काही माणसे प्रत्येक गोष्टीच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. नागपूरचे प्रणव निंबाळकर हे तसेच एक व्यक्तिमत्त्व. प्रणव एक अभियंता आहेत आणि आयटी कंपन्यात त्यांनी ११ वर्ष सेवा दिली आहे. निसर्गाबद्दल नितांत आदर असलेल्या ‘अजनीवन बचाव’ मोहिमेत सक्रिय सहभाग होता. त्यांनीच या भागातील मधमाशांविषयी अभ्यास केला होता. इंटरनेटवरून मधमाशांविषयी अभ्यास करताना मधनिर्मितीच्या व्यवसायाची कल्पना आली. नोकरी करीत असताना मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाविषयी माहिती नसल्याने वाईट अनुभवही आले. मात्र जिद्द सोडली नाही. पुढे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. मधमाशांच्या २०० पेट्या घेतल्या. नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष याकडे दिले. मधमाशा वाढत गेल्या आणि आज त्यांच्याकडे १००० झाल्या आहेत. मधमाशांच्या माध्यमातून निसर्गाविषयी असलेल्या प्रेमामुळे यश मिळाल्याचे ते सांगतात.

फुलांसाठी देशभर स्थलांतर

प्रणव यांनी देशात वेगवेगळ्या भागात काेणत्या वेळी काेणते पीक हाेते आणि त्यात मधमाशांसाठी काेणते पीक चांगले याचाही अभ्यास केला. हवामानाचाही अभ्यास करावा लागला. झाडांवर किंवा पिकांवर फुलांचा बहर १५-२० दिवस किंवा महिना-दीड महिना असताे. माेहरी, काेथींबिर, सूर्यफूल असे पिक असलेल्या भागात पेट्या घेऊन सातत्याने स्थलांतर करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मधमाशा घटणे हे पर्यावरणावरचे संकट

शहरातच नाही तर ग्रामीण भागातही मधमाशांची संख्या वेगाने कमी झाली आहे. माेठ्या झाडांवर दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. जंगलातही ते कमी झाले आहे. फूलझाडे व फळझाडांच्या परागीकरणात व त्यातून पिकांचे उत्पादन वाढविण्यात मधमाशांचे महत्त्व अधिक आहे. डाळींबाचे परागीकरण तर मधमाशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे मधमाशा कमी झाल्याने पिकांच्या उत्पादनासह पर्यावरणावर माेठे संकट आहे.

हायब्रीड पिकांमुळेही मधमाशा कमी

मधमाशा कमी हाेण्यामागे अमर्याद वृक्षताेड, पिकांवर पेस्टीसाईडची फवारणी आणि हायब्रीड पिकांची प्रचंड वाढ हे माेठे कारण आहे. मधमाशांना आवडणाऱ्या निलगिरी, सूर्यफुलांमध्ये छान मध असते पण हायब्रीड पिकांच्या फुलांमध्ये मध कमी येते किंवा मिळतही नाही. शिवाय रासायनिक फवारणीमुळे मधमाशा मरत आहेत. त्यामुळे हायब्रीड ऐवजी देसी पिकांची लागवड करण्यासाठी माेहीम राबविणार असल्याचे प्रणव यांनी सांगितले.

संवर्धनासाठी ही झाडे महत्त्वाची

- प्रणव यांच्या मते मधमाशांचे संवर्धन करणे ही माणसाची गरज आहे. मधमाशांना आकर्षित करणारी वड, पिंपळासारख्या माेठ्या झाडांची लागवड. - जांभूळ, कढीपत्ता, काटेसावर, सिसम, बाेर, पेरू, लिंबू, संत्रे, माेसंबी, बाभुळ, खेर, वाळवंटातील शमी, निलगिरी अशा झाडांची लागवड करावी.

- उद्यानात लाजवंतीसारखी झाडे लावावी. पेस्टीसाईडची फवारणी बागेत टाळावी.

- इमारतींवर लागलेली मधमाशांची पाेळे रासायनिक स्प्रे मारून काढू नयेत.

Web Title: Success of beekeeping business from bee study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.