किंग्जवे हॉस्पिटलमध्ये यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:24+5:302021-04-10T04:07:24+5:30

नागपूर : मध्य भारतातील प्रसिद्ध किंग्जवे हॉस्पिटलमध्ये पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी ठरले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी निवासी आईने आपल्या २८ ...

Success at Kingsway Hospital | किंग्जवे हॉस्पिटलमध्ये यशस्वी

किंग्जवे हॉस्पिटलमध्ये यशस्वी

Next

नागपूर : मध्य भारतातील प्रसिद्ध किंग्जवे हॉस्पिटलमध्ये पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी ठरले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी निवासी आईने आपल्या २८ वर्षीय मुलाला किडनी दिली. किंग्जवे हॉस्पिटलमध्ये झालेल्या या प्रत्यारोपणाला यशस्वी बनविण्यासाठी नेफ्रोलॉजिस्ट अ‍ॅण्ड ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. प्रकाश खेतान, डॉ. विशाल रामटेके, युरोलॉजिस्ट अ‍ॅण्ड ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. वासुदेव रिधोरकर, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. प्रज्ज्वल महात्मे, अ‍ॅनॅस्थिओलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखरन चाम, डॉ. सुमन बन्सल, डॉ. शीतल जैन, डॉ. स्वप्ना भुरे यांचे योगदान राहिले. प्रत्यारोपणाच्या निर्धारित वेळेनंतर रुग्णाला हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली. काही महिन्यांपूर्ण किंग्जवे हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाला केंद्राची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पहिले प्रत्यारोपण करण्यात आले. येथील ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत तसेच अनुभवी आणि विशेतज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूची सेवा मिळते. किडनी प्रत्यारोपणानंतर रुग्णाची देखभाल करण्यासाठी येथे वेगळी आयसीयू आहे. हॉस्पिटल भविष्यात किडनीसह लिव्हर, हृदय, फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी प्रयत्नरत आहे. अत्याधुनिक हॉस्पिटल असल्यानंतरही अत्यंत किफायत पॅकेजमध्ये प्रत्यारोपण करण्यात येते. (वा.प्र.)

Web Title: Success at Kingsway Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.