‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

By admin | Published: February 28, 2016 03:13 AM2016-02-28T03:13:33+5:302016-02-28T03:13:33+5:30

स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे.

The success of 'Mangalyaan', symbol of scientific prosperity | ‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

Next

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर : ‘लोकमत’शी साधला संवाद
नागपूर : स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे. येणाऱ्या दिवसात असे आणखी वैज्ञानिक आविष्कार पाहायला मिळतील. याचा फायदा सामान्य जनतेला होईल. देशातील वैज्ञानिक लोकांना चंद्रावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे व्यक्त केले.
लोकमतशी चर्चा करतांना डॉ. नारळीकर यांनी देश आणि विदेशात सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक प्रयोग व शोध सातत्याने सुरू राहतात.
पहाडाचे शिखर आणि दरी यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकतांना डॉ. नारळीकर यांनी सांगितले, एक वेळ असते जेव्हा अनेक प्रकारचे शोध समोर येतात. तो क्षण पहाडाच्या शिखरासारखा असतो. त्यानंतर नवीन संशोधनाच्या कामाला लागणे म्हणजे खालून पहाडावर चढण्यासारखे असते. जेव्हा शिखरावर पोहोचू तेव्हा संशोधन पूर्ण होते. असेच शोध सातत्याने होत असतात. (प्रतिनिधी)


एका ‘गॉड पार्टीकलने’ काही होणार नाही
डॉ. नारळीकर यांनी सांगितले की, गॉड पार्टीकलच्या शोधात जगभरातील वैज्ञानिक गुंतले आहेत. त्यात एकाच गॉड पार्टीकलचा शोध लागला आहे. केवळ एका पार्टीकलच्या शोधाने कुठलाही फायदा किंवा नुकसान समजून येणार नाही. आणखी पार्टीकलचा शोध करण्यात यावा. पार्टीकल फिजिक्समध्ये आणखी सक्रिय व्हावे लागेल.

गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यास उशीर झालेला नाही
गुरुत्वाकर्षण लहरींबाबत आईन्स्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वीच घोषणा केली असली तरी त्याला ट्रेस करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ते शोधण्यास उशीर झालेला नाही. मागील १० वर्षांपासून ‘लायगो एक्सपरिमेंट’ केले जात होते. परंतु अ‍ॅडव्हॉन्स लायगो एक्सपरिमेंट करण्यात आल्यामुळेच या लहरी ट्रेस करता येऊ शकतात. त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर संशोधन सुरू आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी सांगितले.

Web Title: The success of 'Mangalyaan', symbol of scientific prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.