नागपूर जिल्ह्यातील खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:05 PM2018-08-31T23:05:55+5:302018-08-31T23:07:34+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात खापा येथील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली. नागपूर जिल्ह्यातील महावितरणचा हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून तो ९०० किलोवॉटचा आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे संपूर्ण राज्यात गतीने सुरु झाली आहेत.

The successful test of the solar power project at Khapa in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी

नागपूर जिल्ह्यातील खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना :महावितरणचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात खापा येथील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली. नागपूर जिल्ह्यातील महावितरणचा हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून तो ९०० किलोवॉटचा आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे संपूर्ण राज्यात गतीने सुरु झाली आहेत.
महावितरणने ईएसएलसोबत या प्रकल्पासाठी आणि वीज खरेदीसाठी करार केला आहे. जागा महावितरणची असून प्रकल्प ईएसएल या कंपनीने तयार केला. तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभारला गेला आहे. गेल्या १८ मे रोजी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून चार महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला. सुमारे ३५० ते ४०० शेतकऱ्यांना या प्रकल्पातून वीज मिळणार असून लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० ते १२ तास आणि स्वस्त वीज मिळावी म्हणून शासनाने ही योजना आणली आहे. लवकरच बुटीबोरी आणि कुही येथेही अनुक्रमे ९०० किलोवॅट आणि ५०० किलोवॅटचे प्रकल्प महावितरण उभारणार आहे.
यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिध्दी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथील सौर ऊर्जा प्रकल्पांची यशस्वी चाचणी नुकतीच झाली आहे. हे दोन्ही प्रकल्प महानिर्मितीने पूर्ण केले आहेत. खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा तिसरा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, चाचणी विभागाचे अधीक्षक अभियंता बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता डी. एन. साळी उपस्थित होते.

Web Title: The successful test of the solar power project at Khapa in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.