निवृत्तीपेक्षा उत्तराधिकाऱ्याचे नियोजन जास्त महत्त्वाचे : राहुल बजाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:49 PM2019-01-03T21:49:57+5:302019-01-03T21:58:08+5:30

मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी बजाज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

Successor's planning is more important than retirement: Rahul Bajaj | निवृत्तीपेक्षा उत्तराधिकाऱ्याचे नियोजन जास्त महत्त्वाचे : राहुल बजाज

निवृत्तीपेक्षा उत्तराधिकाऱ्याचे नियोजन जास्त महत्त्वाचे : राहुल बजाज

Next
ठळक मुद्देनिवृत्तीची नेमकी वेळ ठरविलेली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी बजाज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
तुम्ही अद्याप निवृत्त का झाला नाही, असे कुणी विचारायची प्रतीक्षा करणे योग्य नाही. उलट काम करणे थांबविल्यावर तुम्ही इतक्या लवकर का निवृत्त झाले, असा लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. त्यामुळेच मी २००५ साली व्यवस्थापनाचे नियंत्रण माझ्या मुलांकडे सोपविले, मात्र अद्यापही त्यांच्यासोबत काम करतो आहे. काम करणे थांबविण्याचा मी विचार करतो आहे, मात्र त्यासाठी मी निश्चित वेळ ठरविलेली नाही, असे बजाज यांनी सांगितले.
‘स्कूटर’ क्षेत्रातून बाहेर पडणे चुकीचा निर्णय
२००९ साली ‘स्कूटर’ उत्पादनातून बाहेर पडण्याच्या व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या निर्णयाबाबत यावेळी राहुल बजाज यांनी भाष्य केले. कंपनीचा चेअरमन या नात्याने मला हा निर्णय पटला नव्हता आणि मी त्याचे समर्थनदेखील केले नाही. मी सार्वजनिकपणे माझी भूमिका मांडली होती. व्यवस्थापकीय संचालकांनी निर्णय घेतला होता व तेच त्याचा उत्तरदायी ठरतील, असे बजाज यांनी स्पष्ट केले. ‘गेअरलेस’ दुचाकींची मागणी वाढत असताना बजाज समूह परत ‘स्कूटर’चे उत्पादन सुरू करणार का अशी विचारणा केली असता तुम्ही एक योग्य प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात, असे उत्तर त्यांनी दिले.
बजाजची चारचाकी लवकरच बाजारात
‘बजाज ऑटो’कडून लवकरच ‘क्युट’ या नावाची चारचाकी बाजारात उतरवली जाणार आहे. या चारचाकीमध्ये ‘टू स्ट्रोक’चे ‘इंजिन’ असून याची किंमत जवळपास सव्वा लाख इतकी असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात लहान कारहूनदेखील ही चारचाकी लहान असेल. शहरांमधील दळवळणाची आवश्यकता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बजाज यांनी सांगितले.
संघ मुख्यालयाची भेट रद्द
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राहुल बजाज यांना संघ मुख्यालयात येण्याचे निमंत्रण दिले होते. विमानतळावर महानगर संघचालक राजेश लोया यांनी बजाज यांना निमंत्रण दिले. बजाज यांनी वेळ असल्यास नक्कीच येऊ, असे कळविले. मात्र काही अडचणीमुळे बजाज भेटायला जाऊ शकले नाहीत. भेट रद्द करत असल्याबाबत त्यांनी लोया यांना कळविले आणि पुढील दौऱ्यात नक्कीच संघ मुख्यालयात येऊ, असे आश्वासन दिले.

 

Web Title: Successor's planning is more important than retirement: Rahul Bajaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.