मध्य रेल्वेने 'या' ४ विशेष रेल्वे गाड्यांच्या ४२ फेऱ्या वाढविल्या
By नरेश डोंगरे | Published: September 29, 2023 01:54 PM2023-09-29T13:54:39+5:302023-09-29T13:55:43+5:30
प्रवाशांची वाढली अचानक गर्दी : मध्य रेल्वेने घेतला निर्णय
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची अचानक गर्दी वाढल्याने मध्य रेल्वेने विविध मार्गावरील रेल्वे गाड्यांची संपत येणारी मुदत वाढविली आहे. त्यामुळ वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या ४ रेल्वे गाड्यांच्या ४२ फेऱ्या आता वाढल्या आहेत. त्या गाड्या खालील प्रमाणे आहेत.
गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष गाडीची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत होती. ती आता १७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्थात या कालावधीत ही गाडी १४ फेऱ्या जास्त धावणार आहे. त्याच प्रमाणे परतीची अमरावती पूणे ही विशेष गाडीसुद्धा १४ फेऱ्या जास्त लावणार असून ती १८ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.
०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह या विशेष साप्ताहिक गाडीच्या ७ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून ती आता १४ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. तर, परतीच्या मार्गावरील गाडी क्रमांक ०११२८ बल्हारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीसुद्धा ७ अतिरिक्त फेऱ्या लावणार असून तिची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत होती. ती आता १५ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.