मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 03:42 PM2023-02-02T15:42:20+5:302023-02-02T15:43:03+5:30

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते.

Sudhakar Adbole is victorious in Nagpur padavidhar constituency, nana patole critics on bjp | मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

googlenewsNext

नागपूर/मुंबई - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. येथे २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले होते. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले होते. हॅट्ट्रीकपूर्वीच नागो गाणार यांची विकेट पडली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहित दिली. 

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आल्या. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नागपूर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाली आहेत. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला, अशा शब्दात भाजपवर टीकाही केली. 

अशी झाली मतमोजणी

दरम्यान, येथील एकूण २८ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली होती. उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर, उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
 

Web Title: Sudhakar Adbole is victorious in Nagpur padavidhar constituency, nana patole critics on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.