सुधाकर गायधनी यांना इटलीचा ‘सिल्व्हर क्राॅस फॉर कल्चर; वर्ल्ड मेडल’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:36 PM2021-10-09T20:36:56+5:302021-10-09T20:58:37+5:30
Nagpur News युरोपमधील इटली देशातील वर्ल्ड युनियन ऑफ पोएट्स या जागतिक साहित्य संस्थेने या वर्षीचा ‘सिल्व्हर क्राॅस फॉर कल्चर : वर्ल्ड मेडल’ हा युरोपातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार महाकवी सुधाकर गायधनी यांना घोषित केला आहे.
नागपूर : युरोपमधील इटली देशातील वर्ल्ड युनियन ऑफ पोएट्स या जागतिक साहित्य संस्थेने या वर्षीचा ‘सिल्व्हर क्राॅस फॉर कल्चर : वर्ल्ड मेडल’ हा युरोपातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार महाकवी सुधाकर गायधनी यांना घोषित केला आहे.
या संस्थेचे अध्यक्ष जागतिक कवी, नाइटहूड ऑफ पोएट्री ऑफ केएनटी, सर सिल्वानो बोर्टालाझी यांनी गायधनी यांना ई-मेल करून ही बातमी कळविली आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. या संस्थेचे जगभरात १५ लाख सदस्य आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गायधनी यांच्या ‘देवदूत’ या महाकाव्याचे अडीच खंड इटालियन कवयित्री इन्झा सालपियात्रो यांनी इटालियन भाषेत अनुवादित केले असून ते युरोपातील साहित्याला वाहिलेले प्रसिद्ध मासिक कॉन्टॅक्ट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहेत. याच मासिकाने या वेळचा विशेषांक गायधनी यांच्या कवितेला समर्पित करून त्यांना ‘लारीयट-द-ग्रेट इंडियन ऐपिक पोएट’ या विशेषणाने गौरवांकित केले आहे.