रुग्णांची लूट चालविणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:39 AM2018-07-24T00:39:23+5:302018-07-24T00:44:01+5:30

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी, या योजनेतील पाच रुग्णालयांवर विमा कंपनीकडून आणि रुग्णांकडूनही पैसे उकळल्याचा तसेच पात्र रुग्ण असतानाही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत योजनेतूनच बाहेर काढले. यात काँग्रेसनगर येथील श्रीकृष्ण हृदयालय, क्रिसेंट हॉस्टिपल, मेडिट्रिना हॉस्पिटल, केशव हॉस्पिटल आणि शतायु हॉस्पिटलचा समावेश आहे.

Suffering patients looting, Action on hospitals | रुग्णांची लूट चालविणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

रुग्णांची लूट चालविणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : पाच रुग्णालयांना योजनेतून काढले बाहेर : विमा कंपनी व रुग्णांकडून पैसे घेणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी, या योजनेतील पाच रुग्णालयांवर विमा कंपनीकडून आणि रुग्णांकडूनही पैसे उकळल्याचा तसेच पात्र रुग्ण असतानाही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत योजनेतूनच बाहेर काढले. यात काँग्रेसनगर येथील श्रीकृष्ण हृदयालय, क्रिसेंट हॉस्टिपल, मेडिट्रिना हॉस्पिटल, केशव हॉस्पिटल आणि शतायु हॉस्पिटलचा समावेश आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत या योजनेंतर्गत उपराजधानीत शासकीय व खासगी मिळून ३५ रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये १ जुलै २०१७ ते आजपर्यंत सुमारे २७ हजार रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात आले. या रुग्णालयांना उपचाराच्या बदल्यात नॅशनल इन्शोरन्स या विमा कंपनीकडून ५५ कोटीहून जास्तेची रक्कम अदा करण्यात आली. विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही. परंतु काही रुग्णालयांनी हा नियम धाब्यावर बसवत विविध तपासणीसह इतर अतिरिक्त खर्चाच्या नावावर नातेवाईकांकडून लक्षावधी रुपयांची अवैध वसुली केल्याच्या तक्रारी या योजनेच्या कार्यालयांना प्राप्त झाल्या. यात ही पाच रुग्णालये समोर आली. चौकशी करून रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली.
रुग्ण पोहचताच सुरू व्हायची लूट
मिळालेल्या माहितीनुसार, योजनेतून बाहेर काढलेल्या रुग्णालयात कुणी पात्र रुग्ण गेल्यास त्याला रुग्णालयाचा खर्च अवाजवी सांगितला जायचा; नंतर या योजनेंतर्गत आवश्यक दस्तावेज पास करण्यासाठी पैसे मागितले जायचे. रुग्ण भरती झाल्यावर पॅथालॉजी तपासणीपासून ते विविध प्रकारच्या ‘रिपोर्ट’साठी पैसे जमा करण्यास सांगितले जायचे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींना घेऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संबंधित रुग्णालयाची पाहणी केली. यात तक्रारी खºया असल्याचे सामोर आले. विमा कंपनीचा हा चौकशी अहवाल सादर करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याला गंभीरतेने घेऊन तत्काळ दोषी रुग्णालयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
चौकशीत असेही आढळून आले की, श्रीकृष्ण हृदयालय हॉस्पिटल आणि क्रिसेंट हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून हजारो रुपयांची वसुली केली जायची. योजनेतील पात्र रुग्णांना सांगितले जायचे की, रुग्णालयाच्या खर्चापैकी एक लाख रुपये माफ केले जातील, परंतु उर्वरित रक्कम भरावी लागेल. भरलेल्या रकमेचे बिल दिले जात नव्हते. सांत्वना दाखवून काही पैसे परत केले जायचे किंवा माफ केले जायचे.
तक्रारी आल्यास कारवाई
नागपुरातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयावर मुंबई येथून देखरेख केली जाते. आरोग्य विभाग त्यांना आवश्यक मदत करते. योजनेतील पात्र रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असतील तर त्याच्या तक्रारीवरून योग्य पावले उचलली जातात. पाच रुग्णालयांना या योजनेतून बाहेर काढल्याची माहिती आहे.
डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर मंडळ

 

Web Title: Suffering patients looting, Action on hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.