तासभर दमदार
By admin | Published: June 27, 2017 01:54 AM2017-06-27T01:54:46+5:302017-06-27T01:54:46+5:30
गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला.
३८.८ मि.मी. पाऊ स : उपराजधानीत सर्वत्र पाणी-पाणी, वाहतूकही विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. उड्डाणपूल,चौक व वस्त्यांत पावसाच्या तडाख्यात सापडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पावसाळी नाल्या साफ नसल्याने पाऊ स थांबल्यानंतर बराच वेळ पाणी साचून असल्याचे चित्र होते. नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ३८.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे व सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मध्य भारतात मान्सूनला सुरुवात झाली आहे.
नागपूर शहरात सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ नंतर आकाशात ढग जमायला लागले. दीड वाजताच्या सुमारास गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात जोराचा पाऊ स झाला. जवळपास सव्वातास चांगला पाऊ स झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उड्डाणपुलावर
पाणी साचले
उड्डाणपुलावर सहसा पाणी साचत नाही. परंतु टेकडी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी पाणी साचले होते. किंग्सवे, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स व एलआयसी चौकातही पाणी साचले होते.
रेल्वेस्टेशनवर जायचे कसे?
पावसामुळे रेल्वेस्टेशन परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे स्टेशनमधून बाहेर पडणारे व स्टेशनवर जाणारे प्रवासी त्रस्त झाले होते. स्टेशनवर जायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. रामझुला व टेकडी मंदिराच्या समोरील खोलगट भागात पाणी साचले होते. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पाऊ स आला की पाणी साचते
पाऊ स आला की शहरातील काही ठिकाणी पाणी साचते. यात नरेंद्रनगर पूल, लोहापूल, शंकरनगर चौक, जगनाडे चौक, रेशीमबाग मैदानाजवळचा भाग, मेडिकल चौक, वर्धा रोडचा काही भाग, पारडी चौक ते कळमन्याकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणांचा यात समावेश आहे.
कळमना बाजारातील
मिरचीचे नुकसान
पावसामुळे कळमना बाजारात उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य व मिरचीची पोती भिजल्याची माहिती आहे. शेतमाल ठेवण्यासाठी शेड उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
मनपाची पोलखोल
४शहरात मुसळधार पाऊ स झाला नाही. तास-दीड तास पाऊ स पडला, पण थोड्याशा पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचते. अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे, ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, बुजलेल्या पावसाळी नाल्या, सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे थोडासा पाऊ स झाला तरी पाणी साचते. यामुळे महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोल खुलली आहे. नाल्यातील गाळ व कचरा साफ न केल्याने पाणी तुंबत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.