मतदार यादीवर १ पासून सूचना व आक्षेप

By admin | Published: September 25, 2015 03:51 AM2015-09-25T03:51:08+5:302015-09-25T03:51:08+5:30

महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आवश्यक मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Suggestions and objections from 1 on voter list | मतदार यादीवर १ पासून सूचना व आक्षेप

मतदार यादीवर १ पासून सूचना व आक्षेप

Next

शिक्षक मतदारसंघ : ७ डिसेंबरपर्यंत अंतिम यादी तयार करणार
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आवश्यक मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१ आॅक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. ३० नोव्हेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढल्या जातील. ७ डिसेंबरपर्यंत पुरवणी यादी तयार करण्यात येईल आणि १४ डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्यात येईल.
आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमासंबंधी सर्व संबंधित मतदरांना आपले दावे व हरकती असल्यास संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले आहे.

Web Title: Suggestions and objections from 1 on voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.