नागपूर विद्यापीठ वसतिगृहात बीएडच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:50 AM2018-04-01T00:50:31+5:302018-04-01T00:51:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज रविनगर येथील वसतिगृहात शनिवारी एका २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाबू देवीदास आडे असे मृताचे नाव आहे. तो बीएड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज रविनगर येथील वसतिगृहात शनिवारी एका २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाबू देवीदास आडे असे मृताचे नाव आहे. तो बीएड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
मृत बाबू हा मूळचा सोयजना ता. धानोरा जि. वाशिम येथील रहिवासी होता. त्याचे वडील देवीदास आडे हे मंगळूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. तो नागपुरात बीएड करण्यासाठी आला होता. वसतिगृहातील रुम नंबर १७० मध्ये तो सहकाऱ्यांसह राहत होता. त्याचा रुम पार्टनर सध्या गावाला गेला होता. दुपारी १.४५ वाजता घटनेची माहिती होताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे बाबू बेशुद्धावस्थेत पडून होता. त्याच्या जवलच एक प्लास्टीकची बॉटल पडली होती. त्यात विष असल्याची शंका वर्तविली जात आहे. यानंतर बॉटलला सील करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे तर बाबूला उपचारासाठी मेडिकलला दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.