नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:51 AM2018-10-29T10:51:09+5:302018-10-29T10:53:10+5:30

घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.

Suicide by couple in Nagpur | नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

Next
ठळक मुद्देबुटीबोरी येथील घटना घरगुती भांडणामुळे घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना बुटीबोरी येथे रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
सागर जयसिंग गौतम (३१) व कीर्ती सागर गौतम, रा. वॉर्ड क्रमांक-३, बुटीबोरी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सागर हा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचा. तो शनिवारी सायंकाळी रात्रपाळी कामावर गेला होता. त्यामुळे तो रविवारी सकाळी कामावरून घरी परतला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास सागर व कीर्ती यांच्यात घरगुती कारणावरून जोरात भांडण झाले. त्यामुळे सागर घराबाहेर निघून गेला होता.
काही वेळाने तो घरी परतला, तेव्हा त्याला कीर्ती ही खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच सागरनेही लगेच गळफास लावून स्वत:ला संपविले. काही वेळाने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.

दोन वर्षांची चिमुरडी झाली अनाथ
सागर व कीर्तीला दोन वर्षांची मुलगी आहे. रागाच्या भरात तिच्या आईवडिलांनी गळफास लावून स्वत:ला संपविले. एकाचवेळी आई व वडील गेल्याने ती चिमुकली आता अनाथ झाली आहे. आत्महत्या करतेवळी दोघांनीही तिचा विचार केला नाही. या प्रकारामुळे तिच्याविषयी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Suicide by couple in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.