कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:20 PM2019-11-28T18:20:57+5:302019-11-28T18:21:13+5:30
याबाबत सविस्तर वृत असे की, मृत शेतकरी मुकेश उर्फ बापू देविदास वाळके याच्याकडे
नरखेड : येथून जवळच असलेल्या मोगरा(टोळापार) येथील अल्पभूधारक शेतकरी मुकेश उफ॔ बापू देविदास वा ळके (38) यांनी बुधवारी थकीत असलेले कर्जाची परतफेड करता येत नसल्याने स्व:ताच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर वृत असे की, मृत शेतकरी मुकेश उर्फ बापू देविदास वाळके याच्याकडे वडीलोपारजीत फक्त दीड एकर शेती आहे. ते अविवाहीत असल्याने आईवडीलासह याच शेतीवर आपली गुजरान करायचे. पंरतु, मागील साली कोरडा दृष्काळ व यावर्षी ओला दृष्काळ त्याचबरोबर झालेली अतिवृष्टी त्याच्या पथ्यावर पडली. दोन वर्षांपासून विजया बँकेचे 3 लाख रू व इतर 1.75 लाख असे 4.75 लाख रू कर्ज त्यांच्याकडे थकीत आहे. शेतीतून कोणतेच पीक येणार नसल्याने थकीत कर्जाची परतफेड कशी करायची, शासन आपल्या काही मदत करेल का? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. पंरतु, अचानक त्यांचा मृतदेहच विहरीत आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्तेची नोंद नरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून ठाणेदा मलिकारजून इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश खोपे, रूपेश राऊत पुढील तपास करीत आहे.