नागपुरात नैराश्यामुळे केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:57 PM2020-05-05T18:57:56+5:302020-05-05T18:59:56+5:30

बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Suicide due to depression in Nagpur | नागपुरात नैराश्यामुळे केली आत्महत्या

नागपुरात नैराश्यामुळे केली आत्महत्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

सुरेश नामदेवराव अर्जापुरे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाचपावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जापुरे जसवंत टॉकीज मागे, बुद्धनगरात कुटुंबीयांसमवेत राहात होते. लॉकडाऊनमुळे हाताला कोणताही कामधंदा नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना दारूचेही व्यसन होते. हातात पैसे नसल्याने व्यसन भागविणेही कठीण झाले होते. त्यामुळे ते तीन-चार दिवसापासून अस्वस्थ होते.
दरम्यान, त्यांच्या घरची मंडळी सोमवारी रात्री ८ वाजता टीव्हीसमोर कार्यक्रम बघत बसली. तेही तिथेच होते. काही वेळेनंतर अर्जापुरे टीव्ही समोरून उठून घराच्या मागच्या रूममध्ये गेले. त्यांनी सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास बांधून आत्महत्या केली. टीव्हीवरील मालिका संपल्यानंतर कुटुंबातील एक सदस्य बाथरूमला जाण्यासाठी मागे आले असता त्यांना अर्जापुरे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे आरडाओरड झाली. घरच्यांनी तिकडे धाव घेऊन अर्जापुरे यांना खाली उतरवले. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी पाचपावली पोलिसांना सूचना दिली. हवालदार ज्ञानेश्वर जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पोहचले. त्यांनी अर्जापुरे यांना मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्जापुरे यांचे बंधू विनोद नामदेवराव अर्जापुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Suicide due to depression in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.