नागपुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:34 AM2019-08-06T00:34:27+5:302019-08-06T00:35:04+5:30

अवैध सावकारी करणाऱ्याने कर्जवसुलीसाठी केलेला अपमान आणि त्याच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका छोट्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ३० जुलैला घडलेल्या या घटनेमागचे कारण उघड झाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी प्रणय गायकवाड (रा. भिलगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Suicide by mental harassed by lender in Nagpur | नागपुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

नागपुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्याने घेतला विषाचा प्याला : यशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकारी करणाऱ्याने कर्जवसुलीसाठी केलेला अपमान आणि त्याच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका छोट्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ३० जुलैला घडलेल्या या घटनेमागचे कारण उघड झाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी प्रणय गायकवाड (रा. भिलगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी प्रणय प्रॉपर्टी डीलिंगच्या आडून अवैध सावकारी करतो. गरजूला रक्कम उधार देऊन तो एक महिन्यात एक लाखाचे पावणेदोन लाख रुपये घेतो. कॅनल कामठी मार्ग, भिलगाव येथे छोटेसे दुकान चालविणारे आदित्य विनोद भुताड (वय २९) यांनी आरोपी प्रणयकडून एक महिन्याच्या बोलीवर ५० हजार रुपये उधार घेतले होते. ते वसूल करण्यासाठी प्रणयने आदित्यमागे तगादा लावला होता. तो आदित्यला ५० हजारांच्या बदल्यात व्याजासह ८५ हजार रुपये परत मागत होता. आर्थिक कोंडीमुळे रक्कम परत करण्यास असमर्थ असलेल्या आदित्यला आरोपी वारंवार धमक्या देत होता. प्रणयने आदित्यला मारहाणही केली होती. त्याच्याकडून होणारा अपमान आणि जाच असह्य झाल्याने ३० जुलैला दुपारी आदित्यने विष प्राशन केले. त्याला रुग्णालयात नेले असता ३१ जुलैला उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदित्यच्या आत्महत्येला आरोपी प्रणय गायकवाड कारणीभूत असल्याची तक्रार शुभम विनोद भुताड (वय २६) यांनी नोंदविली. त्यावरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Suicide by mental harassed by lender in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.