अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:40+5:302021-02-05T04:38:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : १७ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या घरी कुणीही नसताना शुक्रवारी (दि. २९) दुपारी साडीने गळफास लावून ...

Suicide of a minor student | अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : १७ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या घरी कुणीही नसताना शुक्रवारी (दि. २९) दुपारी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी ‘सुसाईड नाेट’ लिहून ठेवली हाेती. त्या आधारे पाेलिसांनी आराेपीस अटक केली.

अमर गदाई (२०, रा. म्हसेपठार-माेहपा, ता. कळमेश्वर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ती ताराबाेडी (ता. काटाेल) येथे राहायची तसेच मेटपांजरा (ता. काटाेल) येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकायची. ६ जानेवारी २०२१ राेजी ती म्हसेपठार येथे तिच्या नातेवाइकाकडे लग्नाला गेली हाेती. अमरही त्या लग्नात आला हाेता. त्यानंतर २५ जानेवारी २०२१ राेजी अमरने तिला पळून जाण्यासाठी आग्रह धरला हाेता. पळून जाण्यास नकार दिल्यास तिचे अश्लील फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी अमरने तिला दिली हाेती. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या वडिलांनाही सांगितला हाेता. त्यावर वडिलांनी तिची समजूत काढून तिला शांत राहण्याची सूचनाही केली हाेती.

घटनेच्या दाेन दिवसांपूर्वी अमर मरगसूर (ता. काटाेल) भवानी मंदिरात आला असता, तिच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले हाेते. त्यातच शुक्रवारी घरी कुणीही नसताना तिने घरी छलाला साडी बांधून गळफास लावून घेतला. माहिती मिळताच कुटुंबीय घरी आले. ताेपर्यंत ती गतप्राण झाली हाेती. तिच्या ‘सुसाईड नाेट’च्या आधारे काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०६ अन्वये गुनहा नाेंदवून आराेपी अमरला अटक केली.

...

स्वहस्ताक्षरातील ‘सुसाईड नाेट’

ही ‘सुसाईड नाेट’ तिने स्वत: लिहिलेली असून, मी अमरवर प्रेम केले. पण, त्याने मला धाेका दिला. ताे माझा गुन्हेगार आहे. ताे मुलींच्या आयुष्याशी खेळताे. मुलींची बदनामी करताे. यासह अन्य बाबी त्या ‘सुसाईड नाेट’मध्ये नमूद असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Web Title: Suicide of a minor student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.