विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:10+5:302021-09-08T04:12:10+5:30
कामठी : पतीशी फारकत घेतल्यानंतर विवाहितेचे दुसऱ्या तरुणाशी सूत जुळले. त्याने तीन महिन्यांनंतर लग्न करण्याची सूचना केली. मात्र, ताे ...
कामठी : पतीशी फारकत घेतल्यानंतर विवाहितेचे दुसऱ्या तरुणाशी सूत जुळले. त्याने तीन महिन्यांनंतर लग्न करण्याची सूचना केली. मात्र, ताे निघून गेल्यानंतर तिने छताच्या पंख्याला फास बांधून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना कामठी शहरात साेमवारी (दि.६) रात्री मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
शाहीन बानो मोहम्मद शकीम (२६, रा.लकडगंज, तेलीपुरा, कामठी) असे मृताचे नाव आहे. तिने काही महिन्यांपूर्वी पतीकडून साेडचिठ्ठी घेतली हाेती. त्यानंतर, तिचे उमेर उद्दीन फैजुद्दिन अन्सारी (३१, रा.कामठी) या विवाहित तरुणाशी प्रेमसंबंध जुळले हाेते. ती लकडगंज, तेलीपुरा, कामठी येथे किरायाच्या घरात राहायची. दाेघेही साेमवारी रात्री भेटले हाेते. त्याच वेळी तिने उमेरकडे लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता. त्याने लग्न करण्याचे आश्वासन देत, पुढील तीन महिने आपल्याला लग्न करता येणार नसल्याचेही तिला सांगितले हाेते.
ताे घरून निघून गेल्यानंतर, रात्री ११ वाजताच्या सुमारास छताच्या पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतला. ही बाब मध्यरात्री उघड झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी उमेर उद्दीन फैजुद्दीन अन्सारी याच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली.