विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:06+5:302021-09-16T04:13:06+5:30
रामटेक : पतीच्या आजारपणाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...
रामटेक : पतीच्या आजारपणाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री माईन येथे मंगळवारी (दि. १४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
किरण शालीक राैतेल (५०, रा. कांद्री माईन, मनसर, ता. रामटेक) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरच्या आजारामुळे त्रस्त आहेत. पतीच्या आजारपणाला कंटाळून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला व उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी माणिक बंदी राैतेल (७५, रा. कांद्री माईन, मनसर) यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस नाईक गजानन उकेबाेंद्रे करत आहेत.