कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: June 9, 2017 04:11 PM2017-06-09T16:11:54+5:302017-06-09T16:11:54+5:30
वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती: वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी ९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या शेतकऱ्यावर तीन लाखांचे खासगी कर्ज होते. मशागतीसाठी आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे चिंताग्रस्त स्थितीत या शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ृ
शरद शंकरराव कुकडे (रा. कुरळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे तीन भाऊ मिळवून ५ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळेत्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. खरीप हंगाम तोंडावर असूनही मशागतीसाठी पैसा नव्हता. त्यात कर्जवसुलीसाठी सतत तगादा सुरू असल्याने अखेर राहत्या घरातच शरद कुकडे यांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. वरूड पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा नोंदविला.