नाेकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:35+5:302021-04-28T04:08:35+5:30
कन्हान : वर्षभरापासून नाेकरी न मिळाल्याने नैराश्यातून तरुणाने नदीच्या पुलाखाली उडी घेत आत्महत्या केली. रविवारी दुपारच्या सुमारास कन्हान नदी ...
कन्हान : वर्षभरापासून नाेकरी न मिळाल्याने नैराश्यातून तरुणाने नदीच्या पुलाखाली उडी घेत आत्महत्या केली. रविवारी दुपारच्या सुमारास कन्हान नदी पुलाखाली त्याचा मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.
हेमराज रामकृष्ण वकलकर (३३, रा. स्वामी विवेकानंदनगर, कन्हान) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे २३ एप्रिल राेजी दुपारी २.३० वाजता कुणालाही न सांगता घरून निघून गेला. कुटुंबीयांची त्याचा नातेवाइकांकडे शाेध घेतला असता, ताे कुठेही आढळून न आल्याने त्याच्या बेपत्ता असण्याबाबत कुटुंबीयांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. दरम्यान, रविवारी (दि.२५) दुपारी कन्हान नदी पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर रामकृष्ण वकलकर यांनी जाऊन पाहिले असता, ताे त्यांचा माेठा मुलगा हेमराज असल्याचे आढळून आले. गेल्या वर्षभरापासून नाेकरी न मिळाल्याने ताे हताश हाेता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार अरुण सहारे करीत आहेत.