जीवनाची स्पर्धा परीक्षा नाकारत तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:49+5:302021-01-23T04:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परपक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने शारपरिक दुखण्यापुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परपक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने शारपरिक दुखण्यापुढे गुडघे टेकले. जीवनाची स्पर्धा परीक्षा नाकारत तिने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. समीक्षा राजकुमार मेश्राम (वय २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.
समीक्षा तिच्या कुटुंबीयांसोबत सोनेगावमधील आनंदनगर, साैदामिनी सोसायटीत राहत होती. तिने एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे तिचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी ती दोन वर्षांपासून यूपीएससीची तयारी करीत होती. दोन वर्षांपूर्वी तिला अपघात झाल्याने पायाला जबर दुखापत झाली. ते उपचार करून घेतल्यानंतर समीक्षाने पायाच्या वरच्या भागात प्लास्टिक सर्जरी करून घेतली. त्या जागेवर तिला असह्य खाज सुटायची. वारंवार उपचार करूनही लाभ होत नसल्याने समीक्षा पुरती वैतागली होती. त्यामुळे तिने गळफास लावून घेतला. शक्रवारी सकाळी ८.४५ वाजता तिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे घरच्या मंडळींना जबर मानिसक धक्का बसला. समीक्षाला वडील, आई आणि भाऊ आहे. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहे. भावाचे शिक्षण सुरू आहे. समीक्षाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवत कुटुंबीयांची माफी मागितल्याचे समजते. दरम्यान, सोनेगावचे हवालदार दिलीप बेलेकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---