सुमित्रा कुंभारे ठरल्या जिल्हा परिषदेतील पहिल्या महिला उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 06:15 PM2021-11-12T18:15:49+5:302021-11-12T18:22:04+5:30

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या.

Sumitra Kumbhare became the first woman vice president of Zilla Parishad nagpur | सुमित्रा कुंभारे ठरल्या जिल्हा परिषदेतील पहिल्या महिला उपाध्यक्ष

सुमित्रा कुंभारे ठरल्या जिल्हा परिषदेतील पहिल्या महिला उपाध्यक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देबहुमताने झाली निवड : भाजपच्या उमेदवाराला पडली १३ मते

नागपूर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार कैलास बरबटे यांना १३ मते पडली. पीठासीन अधिकारी शेखर गाडघे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत सुमित्रा कुंभारे यांनी अर्ज भरला; तर भाजपकडून कैलास बरबटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. दुपारी तीन वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन्ही उमेदवारांना उपस्थित सभागृहातील सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. भाजपच्या उमेदवाराला १३ मते पडली; तर काँग्रेसच्या सुमित्रा कुंभारे यांना ४३ मते पडली. यात काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे ७, शिवसेना १, गोंडवाना गणतंत्र पार्टी १, शेकाप १ व अपक्ष १ सदस्यांचा समावेश होता. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, नाना गावंडे, अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या उपस्थितीत कुंभारे यांनी पदग्रहण केले.

२०२० रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची निवड झाली होती. या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी ५० वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. नागपूर जिल्हा परिषदेतून १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. या मनोहर कुंभारे यांचाही समावेश होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या १६ जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश केला. त्यात कुंभारे यांचे सर्कल हे महिलांसाठी आरक्षित झाले होते. त्यांनी पत्नी सुमित्रा यांना रिंगणात उतरविले. त्यात त्या विजयी झाल्या आणि शुक्रवारी त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

- पक्षाने माझ्यावर उपाध्यक्षपदाबरोबरच आरोग्य व बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविली आहे. माझे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीन. शेतकऱ्यांच्या अडचणी व पांधण रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.

सुमित्रा कुंभारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर

- दोन सदस्य अनुपस्थित

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५८ पैकी ५६ सदस्यांनीच मतदान केले. या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व भाजपचे मोहन माकडे उपस्थित होते.

Web Title: Sumitra Kumbhare became the first woman vice president of Zilla Parishad nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.