चाहूल उन्हाळ्याची; नागपूरसह विदर्भात पारा चढायला लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:36 AM2019-03-06T10:36:09+5:302019-03-06T10:37:44+5:30
मार्च महिना सुरू होताच नागपूरसह विदर्भातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हवेतील गारठा कमी झाला असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मार्च महिना सुरू होताच नागपूरसह विदर्भातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हवेतील गारठा कमी झाला असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांना दुपट्ट्यांची गरज भासत आहे. त्यासाठी शहरातील मुख्य मार्गावर दुपट्ट्यांची दुकाने लागली आहेत.
मकर संक्रांतीनंतर दिवस कणाकणाने वाढू लागतो तसा महाशिवरात्रीनंतर विदर्भातील उन्हाळाही वाढू लागतो. त्या प्रसिद्ध कडक उन्हाळ््याची चुणूक आता जाणवायला सुरुवात झाली आहे. सध्या तापमान कमाल ३४ व किमान २१ च्या आसपास असले तरी, ते येत्या काही दिवसात ३८-४० पर्यंत जाईल अशी जनमानसात चर्चा होताना दिसते आहे.
सकाळी वातावरणात थोडासा गारवा असतो. दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा जाणवतो व संध्याकाळी परत थोडे थंड वातावरण जाणवते. या विषम वातावरणामुळे नागरिकांना सर्दी पडसे व घसा दुखण्याचा त्रासही वाढला आहे.