उन्हाळ्यात नऊ न्यायमूर्ती करणार काम

By admin | Published: May 9, 2016 03:06 AM2016-05-09T03:06:48+5:302016-05-09T03:06:48+5:30

देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे

In the summer nine judges will work | उन्हाळ्यात नऊ न्यायमूर्ती करणार काम

उन्हाळ्यात नऊ न्यायमूर्ती करणार काम

Next

हायकोर्ट : वकिलांच्या सहमतीने घेतील प्रकरणे
नागपूर : देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यांत नऊ न्यायमूर्ती अंतिम सुनावणीसाठी दाखल प्रकरणे ऐकणार आहेत. त्यासाठी प्रकरणाशी संबंधित सर्व वकिलांनी सहमती देणे आवश्यक आहे.उन्हाळ्यात काम करणार असणाऱ्या न्यायमूर्तींमध्ये भूषण धर्माधिकारी, वासंती नाईक, प्रसन्न वराळे, आर. के. देशपांडे, सुनील शुक्रे, झेड. ए. हक, अतुल चांदूरकर, विनय देशपांडे व स्वप्ना जोशी यांचा समावेश आहे. न्या. धर्माधिकारी १६ ते २७ मे, न्या. नाईक १० ते १३ मे, न्या. वराळे २३ ते २७ मे, न्या. आर. के. देशपांडे १६ ते ३१ मे, न्या. शुक्रे १० ते १३ मे व २३ ते २७ मे, न्या. हक १० ते १३ मे, न्या. चांदूरकर १६ ते २० मे, न्या. विनय देशपांडे १० ते १२ मे तर न्या. जोशी ३० मे ते ३ जूनपर्यंत काम करणार आहेत. उच्च न्यायालयाला ९ मे ते ५ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. सुट्यांमध्ये न्यायमूर्ती काम करण्यास तयार झाले असले तरी वकिलांना मात्र काम करणे बंधनकारक नाही.
संबंधित सर्व वकील उपलब्ध होत असतील तर अशाच प्रकरणांवर अंतिम सुनावणी घेतली जाणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: In the summer nine judges will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.