सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:59 PM2018-05-29T21:59:08+5:302018-05-29T21:59:20+5:30

नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

Sun scorching , mercury reached 46.7 degrees | सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

Next
ठळक मुद्देविदर्भाचे काही जिल्हे ‘रेड अलर्ट’वर : चंद्रपूर ४७.८, वर्धा ४७

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.
मंगळवारची उन्हाळ्यातील सर्वात गरम दिवस म्हणून नोंद करण्यात आली. आगामी २४ तास नागपुरकरांसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे पारा सामान्य पेक्षा पाच अंश वर जाऊ शकतो. मंगळवारी शहराचे तापमान सामान्यपेक्षा ३.५ अंश वर राहिले. नागपुरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. नवतपाच्या राहिलेल्या दिवसातही उन्हापासून दिलासा मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. सातत्याने उन्हाचा प्रकोप सुरुच राहणार आहे. नागपुरात सकाळी ९ वाजेपासूनच गरम हवा सुरु झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. दुपारी १२ पासून ४.३० पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. इतर दिवसांपेक्षा दुपारी रस्त्यावर कमीत कमी वाहने पाहावयास मिळाली. हिट अ‍ॅक्शन प्लॉन नुसार शहराच्या अनेक चौकात ग्रीन नेट लावण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी महापालिकेच्या वतीने हिट अ‍ॅक्शन प्लॉनच्या नावावर काहीच करण्यात आले नाही. सामाजिक संस्थांनी प्याऊची व्यवस्था केली. उद्याने खुले ठेवण्याचे निर्देश होते. परंतु बहुतांश उद्यानांच्या प्रवेशद्वारावर कुलुप लावलेले दिसले. ट्राफिक सिग्नलवर थांबण्याची वेळ आली तेंव्हा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. दुपारच्या वेळी वाहतुक कमी राहत असल्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
४८ तासात ७.९ अंशाने तापमानात वाढ
नागपूर शहराच्या कमाल तापमानात मागील ४८ तासात ७.९ अंशाने वाढीची नोंद करण्यात आली. वादळ आणि पावसामुळे २७ मे रोजी कमाल तापमान ३८.८ अंशावर पोहोचले होते. परंतु दोन दिवसात पाऱ्याने उन्हाळ्यातील उच्चांक गाठून ४६.७ वर पोहोचला.
भरपूर पाणी प्या, शरीराला झाका
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की दुपारी घरातून बाहेर पडण्याचे टाळा. जर बाहेर पडायचे असल्यास भरपूर पाणी प्यावे. शरीराला पूर्णपणे झाकुन घ्यावे. सुती कपडे घालावेत. डोके पुर्णपणे झाकलेले असणे आवश्यक आहे. हेल्मेटच्या वापरामुळे उन्हाच्या संपर्कात येण्यापासून वाचता येऊ शकते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये. निंबु पाण्याचे सेवन करणेही फायद्याचे आहे.

Web Title: Sun scorching , mercury reached 46.7 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.