धुरखेड्याचा वहाब जाणार ‘नासा’त

By Admin | Published: February 3, 2016 02:58 AM2016-02-03T02:58:08+5:302016-02-03T02:58:08+5:30

अंतराळातील घडामोडींचे संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळावी असे स्वप्न संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे असते.

The sun shade will be wahab 'in NASA | धुरखेड्याचा वहाब जाणार ‘नासा’त

धुरखेड्याचा वहाब जाणार ‘नासा’त

googlenewsNext

परिस्थितीवर मात करून गाठले यशाचे शिखर
निशांत वानखेडे  नागपूर
अंतराळातील घडामोडींचे संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळावी असे स्वप्न संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे असते. ही गौरवाची आणि अभिमानाची संधी नागपूर जिल्ह्यात उमरेडपासून चार किलोमीटरवर असलेल्या धुरखेडा या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या वहाब लतीफ शेख या तरुणाला मिळाली आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि संशोधनाची वृत्ती असलेल्या वहाबचा थेट नासापर्यंत पोहचण्याचा प्रवास चित्तथरारक आणि प्रेरणादायी असाच आहे.
‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘रॅँचो’ सर्वांना सुपरिचित आहे. वहाबचा प्रवासही आता रँचो-फुन्सूक वांगडूप्रमाणेच आहे. वहाब लहान असताना आईचे छत्र हरपले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात दहाव्या वर्गात असताना वडिलांचेही निधन झाले. पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला खरा, मात्र आर्थिक विवंचनेमुळे पहिले वर्षही पूर्ण होऊ शकले नाही. शिक्षण सुटले ते कायमचे. एकीकडे परिस्थिती आणि संकट परीक्षा घेत असताना वहाबची वैज्ञानिक वृत्ती मात्र कमी झाली नाही. उलट ती वाढतच गेली.
परिस्थितीचे रडगाणे गाण्यापेक्षा आपले लक्ष विज्ञानाच्या कल्पनांना मूर्त रूप देण्याकडे वळविले. शिक्षण घेता आले नाही, मात्र विज्ञानाचे सूत्र समजाविणाऱ्या इंजिनीअरिंग आणि संशोधनाची पुस्तके त्याने वाचून काढली. कधी मित्रांच्या वर्गात जाऊन बसला. मिळेल त्या पद्धतीने ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. रोजगारासाठी नागपूरला आल्यानंतर मिळेल ते काम त्याने केले. मात्र याचवेळी भंगार झालेल्या गाड्यांचे पार्टस् वहाबचे संशोधन साहित्य झाले. जवळ असलेले थेरॅटिकल ज्ञान प्रॅक्टिकल रूपात साकार करण्याचा प्रयत्न तो सतत करायचा आणि यातून वेगवेगळ्या वस्तू निर्माण झाल्या. मार्केटिंगचे काम करताना वहाबने एक लहान इन्व्हर्टर तयार केला आणि तो बाजारात विकलाही. नंतर मार्केटिंग सोडून याच कामाकडे लक्ष दिले. सोबत आपल्या मित्रांनाही घेतले.

अशी मिळाली नासाच्या प्रशिक्षणाची संधी
नासातर्फे दरवर्षी एप्रिल महिन्यात जगभरातील संशोधक विद्यार्थ्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी ‘नासा रोव्हर चॅलेंज’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिल्या जाते. नासाच्या या शिबिरात भारतातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी एसडीएम संस्थेने नुकतीच बंगळुरु येथे एक कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत वहाबने सादर केलेल्या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. आणि संस्थेने नासामध्ये १५ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठवित असलेल्या देशभरातील पाच प्रतिनिधींमध्ये वहाबची निवड केली. नासानेही या निवडीला मान्यता दिली असून एप्रिल महिन्यात वहाब अमेरिकेला रवाना होणार आहे.

Web Title: The sun shade will be wahab 'in NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.