विदर्भावर सूर्याचा कोप, अकाेला ४४ पार तर चंद्रपूर, अमरावतीचे तापमान ४३ च्यावर

By निशांत वानखेडे | Updated: April 7, 2025 18:55 IST2025-04-07T18:54:46+5:302025-04-07T18:55:12+5:30

नागपूरलाही झळा : दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा

Sun's fury over Vidarbha, Akola crosses 44 degrees, while Chandrapur, Amravati's temperature crosses 43 degrees | विदर्भावर सूर्याचा कोप, अकाेला ४४ पार तर चंद्रपूर, अमरावतीचे तापमान ४३ च्यावर

Sun's fury over Vidarbha, Akola crosses 44 degrees, while Chandrapur, Amravati's temperature crosses 43 degrees

निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर :
एप्रिल महिना पुढे सरकताे तसा सूर्याचा प्रकाेपही वाढायला लागला आहे. विदर्भावर हा काेप अधिकच दिसून येत असून उन्हाच्या झळा अधिक तीव्र हाेत आहेत. साेमवारी अकाेल्याचे कमाल तापमान ४४.२ अंशावर पाेहचले, जे राज्यात सर्वाधिक हाेते. विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून ८ व ९ एप्रिल या पुढच्या दाेन दिवसात उष्ण लाटांचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अकाेल्यात साेमवारी एका अंशाची वाढ हाेत तापमान ४४.२ अंशावर पाेहचले, जे सरासरीपेक्षा ४ अंशाने अधिक आहे. त्या खालाेखाल चंद्रपूर व अमरावतीत ४३.६ अंशाची नाेंद झाली. ब्रम्हपुरीचा पारा ४३.८ अंशावर गेला. दुसरीकडे नागपुरात अंशत: वाढ हाेत पारा ४२.४ अंशावर पाेहचला. वर्धा, यवतमाळातही तापमान ४२ अंशावर हाेते. गडचिराेली ४१ व गाेंदिया ४० अंश नाेंदविण्यात आले. सर्वच जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक चढले आहे. रात्रीच्या तापमानातही किंचित वाढ नाेंदविण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कमाल तापमानात २ ते ४ अंशाची वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यातही ८ व ९ एप्रिल राेजी विदर्भात तापमान वाढून उष्ण लाटांच्या स्थितीचा सामना करावा लागेल. सध्या गुजरातचे साैराष्ट्र, कच्छ, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली व मध्य प्रदेशातही उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल हाेत ढगाळ वातावरण व पुन्हा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण हाेईल, असा अंदाज आहे.

Web Title: Sun's fury over Vidarbha, Akola crosses 44 degrees, while Chandrapur, Amravati's temperature crosses 43 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.