सुपारी व्यापारी कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:40 AM2017-08-28T01:40:50+5:302017-08-28T01:41:08+5:30

विदेशातून आयात केलेल्या सडक्या सुपारीची नागपुरात विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे केंद्रीय जीएसटी (पूर्वीचा केंद्रीय अबकारी विभाग) ...

Supari Traders Kautrit | सुपारी व्यापारी कात्रीत

सुपारी व्यापारी कात्रीत

Next
ठळक मुद्देकेंद्रीय जीएसटी विभागाच्या धाडी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशातून आयात केलेल्या सडक्या सुपारीची नागपुरात विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे केंद्रीय जीएसटी (पूर्वीचा केंद्रीय अबकारी विभाग) विभागाच्या अधिकाºयांनी रविवारी मस्कासाथ येथील दोन व्यापाºयांचे प्रतिष्ठान आणि घरांवर धाडी टाकून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जवळपास ५० पेक्षा जास्त अधिकाºयांनी सकाळी ११ वाजता राजेश बैद जैन आणि सुंदरलाल सुराणा यांच्या मालकीच्या मस्कासाथ येथील जैन सुपारी केंद्रावर व घरांवर धाडी टाकल्या. त्यांच्या व्यवसायाच्या सर्व व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली. दोन्ही व्यापाºयांनी कोट्यवधी रुपयांचा सरकारचा महसूल बुडविल्याचा अंदाज आहे. मस्कासाथ आणि इतवारी हे सुपारी व्यापाराचे देशातील मोठे केंद्र आहे. येथील व्यावसायिकांच्या माध्यमातून सडकी सुपारी अन्य जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि प्रसंगी विदेशातही पाठविली जाते. टणक सुपारी बाजारात विकण्यासाठी सडक्या सुपारीला सल्फर डायआॅक्साईडच्या भट्टीत भाजण्यात येते. त्यामुळे सुपारी विषारी होते. सुपारीच्या माध्यमातून एकप्रकारे विषविक्रीचा हा प्रकार आहे. मस्कासाथ परिसरात सुपारीची अनेक गोदामे असून मोठे व्यापारी या व्यवसायात गुंतले आहेत.
विदेशातून भारतातील पोर्टवर आलेली सुपारी अन्य पोर्टच्या माध्यमातून अन्य देशात पाठविली जाते. पण अनेकजण ही सुपारी स्थानिक बाजारात विक्रीसाठी पाठवितात. या व्यवहाराची विभागाकडे नोंद नसली तरीही अशा व्यवहारातून केंद्र सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकाºयांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Supari Traders Kautrit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.