मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:24 AM2017-10-04T01:24:49+5:302017-10-04T01:25:07+5:30

शहर वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकारापासून ते मूत्रविकारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परंतु अशा रुग्णासांठी मध्य भारतात केवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.

Super Specialty Department in Mayo | मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग

मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग

Next
ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयाचा पुढाकार :

पेडियाट्रिक सर्जरी ते प्लास्टिक सर्जरी विभाग असणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकारापासून ते मूत्रविकारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परंतु अशा रुग्णासांठी मध्य भारतात केवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. आता यात मेयोच्या सुपर स्पेशालिटी विभागाची भर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला असून लवकरच याला मंजुरीही मिळणार आहे. विशेष म्हणजे, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मेयोने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) दिवसेंदिवस व्याप वाढत आहे. या रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरुपातील शस्त्रक्रिया होत असल्यातरी लहान मुलांवरील शस्त्रक्रिया (पेडियाट्रिक सर्जरी)होत नाही. ‘नेफ्रोलॉजी’, ‘युरोलॉजी’, ‘इन्डोक्रिनोलॉजी’ आदी अतिविशेषोपचार विभाग (सुपर स्पेशालिटी) औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागालाच हाताळावे लागतात तर गंभीर रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागते.
येथे आधीच रुग्णांची गर्दी त्यात मेयोच्या रुग्णांची भर पडते. यामुळे रुग्णांची गैरसोय होते. विशेषत: उपचारात उशीर होतो. याची दखल मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. तेवढ्यात तत्परतेने मेयो प्रशासनाने याला पाठबळ दिल्याने अतिविशेषोपचार विभाग सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे.
लहान मुलांच्या हृदयावर होणार शल्यक्रिया
मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयशल्यचिकित्सा विभाग असला तरी येथे लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया होत नाहीत. परंतु शासनाची मंजुरी मिळाल्यास मेयोमध्ये ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभाग असणार आहे. या सोबतच, ‘नेफ्रोलॉजी’, ‘इन्डोक्रिनोलॉजी’, ‘युरोलॉजी’, ‘आॅन्कोलॉजी’ व ‘प्लास्टिक सर्जरी’ आदी विभाग सुरू करण्यात येईल.
माजी विद्यार्थी मानद म्हणून देणार सेवा
शहरात सुपर स्पेशालिटीच्या खासगी सेवेसाठी प्रसिद्ध असणाºया मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी गरीब रुग्णांना अतिविशेषोपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला असून ते मानद म्हणून सेवा देणार आहे. विशेष म्हणजे, या विशेषज्ञाचे १५०० रुपये मानधन वाढवून देण्याचा प्रस्तावही मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.
रुग्णांसाठी फायद्याचे
सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. याचा एक भाग म्हणून मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यास रुग्णांना याचा मोठा फायदा होईल.
-डॉ. अनुराधा श्रीखंडे
अधिष्ठाता, मेयो

Web Title: Super Specialty Department in Mayo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.