गल्लोगल्ली फिरताहेत सुपर स्प्रेडर; यांना कोण आवरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 03:12 PM2021-03-17T15:12:31+5:302021-03-17T15:13:01+5:30

नागपुरातील पोलीसांनी जागोजागी बंदोबस्त लावला आहे. पण काही टवाळखोर सुपर स्प्रेडर म्हणून वस्तोवस्ती गल्लोगल्ली फिरत आहे.

Super spreaders roaming the streets; Who will cover this? | गल्लोगल्ली फिरताहेत सुपर स्प्रेडर; यांना कोण आवरणार?

गल्लोगल्ली फिरताहेत सुपर स्प्रेडर; यांना कोण आवरणार?

Next
ठळक मुद्देकोरोनाचे भान नाही, तोंडावर मास्क नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे एकीकडे करोडो रुपयांचा व्यापार बुडतो आहे. दररोज १० ते १५ लोकांचे जीव जात आहे. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. अडीच हजारपर्यंत रुग्ण पॉझिटीव्ह निघत आहे. पोलीसांनी जागोजागी बंदोबस्त लावला आहे. पण काही टवाळखोर सुपर स्प्रेडर म्हणून वस्तोवस्ती गल्लोगल्ली फिरत आहे. बंद व्यापारी पेठेच्या आड या टवाळखोरांचे दारुचे गुत्ते सुरू आहे. या कडेकोट बंदमध्येही खर्रा, दारूही मिळत आहे.

वस्त्यांमधील चौक, बंद दुकानांचे शेड, पानठेले, चहा कॅन्टींनच्या आड काही लोकं गोळक्याने बसलेले शहरातील बहुतांश भागात आढळले. गंजीफा कुटणे, गप्पा ठोकणे, मोबाईलद्वारे सिनेमा बघणे, खर्रा, गुटखा चघळणे हा सर्व प्रकार गल्ली वस्त्यांमध्ये दिसून आला. गोळका करून बसणाऱ्यांना कोरोनाची कुठलीही भिती दिसून येत नाही. तोंडावर मास्क नाही, बसल्या ठिकाणी खऱ्याच्या मारलेल्या पिचकाऱ्या, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायझर हे तर दूरच आहे. या टवाळखोरांमध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांना हटकायलाही कुणाची हिंमत नाही. कोरोनामुळे कामधंदे बंद असल्याने या टवाळखोरांचा हा ठिय्याच झाला आहे.

- पोलीस दिसताच काढतात पळ

शहरातील महत्वाच्या रस्त्यावर, चौकांमध्ये पोलीसांनी बंदोबस्त लावला आहे. पण गल्ली बोळात पोलीसांचे राऊंड होत आहे. दुकानाच्या शेडखाली गोळका करून बसलेले हे टवाळखोर पोलीसांना बघून पळ काढत आहे.

- पोलीसांना करावे लागले मासोळी मार्केट बंद

महापालिका प्रशासनाने बुधवारपासून दुपारी १ नंतर जीवनावश्यक वस्तूंचीही दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले. दुपारी १ वाजतानंतर मासोळी बाजारात फेरफटका मारला असता, पोलीसांना येऊन दुकाने बंद करावी लागली.

- शुक्रवारी तलावासमोरील रिकामटेकडे हाकलले

शुक्रवारी तलावाजवळ नेहमीच रिकामटेकड्यांची मैफील भरलेली असते. दुचाकी वाहने पार्किंग करून चहा, सिगारेटचे झुरके मारणारे तरुण येथे बसलेले असतात. काही भिकारी सुद्धा सावलीच्या आस?्याने बसलेले दिसतात. परंतु बुधवारी दुपारी शुक्रवारी तलावाच्या शेजारी शुकशुकाट दिसला. पोलीसांनी येथील चहा, पानठेले बंद केल्याचे सांगण्यात आले.

- सेवासदन चौकात रिचवली जात होती दारु

व्यापारी प्रतिष्ठान बंद असल्याने मजूर आणि परिसराली लोक विना कामाने येऊन टाईमपास करताना दिसली. एका बंद दुकानाच्या आढोश्यात काही लोकं दारुही पितांना आढळली. खऱ्याच्या बाबतीत तर विचारूच नका, पानठेले बंद असले तरी, ठेल्याजवळ उभे राहिल्यावर विक्रेता बरोबर खर्रा आणून देत असल्याचे दिसून आले.

Web Title: Super spreaders roaming the streets; Who will cover this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.