विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी

By योगेश पांडे | Published: November 20, 2023 10:53 PM2023-11-20T22:53:16+5:302023-11-20T22:53:25+5:30

गृहविभागातर्फे विदर्भासह राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Superintendent of Police Vishal Singuri Amravati Rural; | विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी

विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी

योगेश पांडे 

नागपूर :
गृहविभागातर्फे विदर्भासह राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नक्षल विरोधी अभियान, विशेष कृती दलाचे (एएनओ) अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांच्याकडे अमरावती ग्रामीण अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले. सिंगुरी यांच्या व्यतिरिक्त गृह मंत्रालयाने अधीक्षक आणि अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिंगुरी यांची ऑगस्ट महिन्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून एएनओमध्ये बदली करण्यात आली होती.

नागपूर शहर पोलिसांनाही दोन उपायुक्त देण्यात आले आहेत. भारतीय पोलीस सेवा २०१९ बॅचचे अधिकारी निकेतन कदम आणि अमरावती ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर गडचिरोलीचेे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची वाशीमच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. गोंदियाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी तर पुण्याचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षणच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्ग अपर अधीक्षक गणेश शिंदे यांच्याकडे अमरावती शहर उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नागपूर झोन पाचचे उपायुक्त श्रवण दत्त व वाशीमचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचीही येत्या काही दिवसांत बदली होणार आहे. त्यांच्या बदलीचा स्वतंत्र आदेश जारी केला जाईल. नाशिक येथील नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षक विक्रम साळी यांची अमरावती ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. एम.रमेश यांची अपर पोलीस अधीक्षक-गडचिरोली, नित्यानंद झा यांची अपर पोलीस अधीक्षक-गोंदिया येथे पदस्थापना करण्यात आली आहे.

Web Title: Superintendent of Police Vishal Singuri Amravati Rural;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.