उपराजधानीत जन्मदर वाढतोय

By admin | Published: September 28, 2015 03:05 AM2015-09-28T03:05:31+5:302015-09-28T03:05:31+5:30

उपराजधानीत गेल्या चार वर्षांत मुलामुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५५ हजार ४१५ बालके तर २०१४ मध्ये ५८ हजार १८० बालके जन्माला आल्याची ....

Superior birth rate is growing | उपराजधानीत जन्मदर वाढतोय

उपराजधानीत जन्मदर वाढतोय

Next

दरदिवशी जन्माला येतात १५० वर बालके : जुलैअखेर ११३३ बालकांचा मृत्यू
नागपूर : उपराजधानीत गेल्या चार वर्षांत मुलामुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५५ हजार ४१५ बालके तर २०१४ मध्ये ५८ हजार १८० बालके जन्माला आल्याची महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे नोंद आहे. त्यानुसार दरदिवशी साधारण १५० बालके जन्माला येत आहेत. विशेष म्हणजे, जन्मदर वाढत असताना एक वर्षाखालील बालकांच्या मृत्यूची संख्याही कमी होताना दिसून येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती सामोर आली आहे.
२०१४ ते जुलै २०१५ पर्यंत जन्म व मृत्यूच्या प्रमाणपत्रातून मनपाच्या तिजोरीत ३० लाख ७२ हजार ३०६ रुपये जमा झाले आहेत. गेल्या चार वर्षांत जन्मदरही वाढला आहे. २०१२ मध्ये २८६५९ मुले तर २६७५६ मुली, २०१३ मध्ये २९४९६ मुले तर २७६८७ मुली, २०१४ मध्ये ३००६२ मुले तर २८११८ मुली जन्माला आल्या. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत १५७४७ मुले तर १५०६४ मुली जन्मल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
पुरुष मृत्यूची संख्या मोठी
उपराजधानीत महिलांच्या तुलनेत पुरुष मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०१२ मध्ये २३८२८ एकूण मृत्यू झाले. यात पुरुषांची संख्या १४२४९ एवढी होती. २०१३ मध्ये एकूण मृत्यूची संख्या २४५२१ मधून पुरुषांची संख्या १४६६६ होती. २०१४ मध्ये २५७४२ मृत्यू झाले यात १५६०० पुरुष मृतांची संख्या होती. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ८७५५ पुरुष तर ५७९२ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

तीन वर्षांत ५२४५ बालकांचा मृत्यू
शहरात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एक वर्षाखालील ५२४५ बालकांचा मृत्यू झाला. २०१२ मध्ये १७६८, २०१३ मध्ये १७६५, २०१४मध्ये १७१२ बालकांच्या मृत्यू नोंद आहे. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ११३३ बालकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Superior birth rate is growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.