कॅमेऱ्याच्या लेन्समधून निसर्गाचे अलौकिक सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:45 PM2019-02-15T23:45:33+5:302019-02-15T23:48:20+5:30

निसर्गाची प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा सौंदर्याने भरलेली आहे. झाडे, पाने, फुले, पक्षी आणि वन्यजीव हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र, छायाचित्रकारांच्या दृष्टीतून या निसर्गाचे, तेथे वावरणाऱ्या वन्यजीवांच्या बारीकसारीक हालचालींचे वेगळेच दर्शन आपल्याला होते. वन्यजीवांच्या अशाच वेगळ्या रुपाचे दर्शन चिटणवीस सेंटरमधील रंगायन गॅलरीत होत आहे.

The supernatural beauty of the nature from the camera's lens | कॅमेऱ्याच्या लेन्समधून निसर्गाचे अलौकिक सौंदर्य

कॅमेऱ्याच्या लेन्समधून निसर्गाचे अलौकिक सौंदर्य

Next
ठळक मुद्देनिसर्गाकडे आकर्षित करणारे छायाचित्र प्रदर्शन : सृष्टी पर्यावरण मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाची प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा सौंदर्याने भरलेली आहे. झाडे, पाने, फुले, पक्षी आणि वन्यजीव हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र, छायाचित्रकारांच्या दृष्टीतून या निसर्गाचे, तेथे वावरणाऱ्या वन्यजीवांच्या बारीकसारीक हालचालींचे वेगळेच दर्शन आपल्याला होते. वन्यजीवांच्या अशाच वेगळ्या रुपाचे दर्शन चिटणवीस सेंटरमधील रंगायन गॅलरीत होत आहे.
सृष्टी पर्यावरण मंडळातर्फे राजू हरकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शना अंतर्गत देशभरातून छायाचित्रकारांना त्यांचे छायाचित्र मागविण्यात आले होते. देशभरातून ७०० छायाचित्र संस्थेला प्राप्त झाले. त्यातून निवडक ८५ छायाचित्र या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील हे नववे प्रदर्शन होय. अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक पूर्व सुनील लिमये यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पर्यटनाचे आकर्षण असले तरी माणूस पर्यावरणापासून कोसो दूर जात आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी यांच्या प्रति नागरिकांमध्ये संवेदनशीलतेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे विनित अरोरा यांनी सांगितले. प्रदर्शनात ताडोबाच्या वाघापासून ते बेंगाल टायगर पर्यंत, फ्लेमिंगो पक्ष्यापासून दार्जिलींगच्या रेड पंडापर्यंतचे आकर्षक छायाचित्र पहावयास मिळतात. सोबतच बारासिंगा, बिबट, काळवीट, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि नदीकाठच्या निसर्गाचे आकर्षक रुपही दृष्टीस पडते. या वन्यजीवांच्या बारीकसारीक हालचालींचे रोमांचक दर्शनच कॅमेऱ्याच्या लेन्समधून छायाचित्रकारांनी घडविले आहे. निसर्गाचा हा खजिना नक्कीच पाहणाऱ्यांच्या डोळ्यात भरतो व नागरिकांची सौंदर्यदृष्टी जागरुक करतो. प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत पाहण्यासाठी खुले आहे.

Web Title: The supernatural beauty of the nature from the camera's lens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.