नागपुरातून पुण्याला ऑक्सिजनचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:00+5:302021-05-14T04:08:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन ते तीन आठवड्यांअगोदर नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती. मात्र कोरोनाबाधितांची संख्या घटत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन ते तीन आठवड्यांअगोदर नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती. मात्र कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. शिवाय दररोज शहरात विविध ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पुण्याला ऑक्सिजनची मागणी वाढली असल्यामुळे नागपुरातून ऑक्सिजनचे चार टँकर पुण्याला पोहोचवण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार हा पुरवठा करण्यात आला आहे.
पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. गडकरींकडे यासंदर्भात विनंती आली असताना त्यांनी तातडीने ऑक्सिजन पाठविण्याचे निर्देश दिले. गोव्यामध्येदेखील ऑक्सिजनची मागणी वाढते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार दररोज एक टँकर ऑक्सिजन गोव्याला पोहोचविण्याची सूचना गडकरींनी दिली आहे.
मागील दोन दिवसांपासून नागपूरला झालेला पुरवठा
दिनांक : साठा
११ मे : १२४ मेट्रिक टन
१२ मे : ११० मेट्रिक टन