शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे-खताचा पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:27+5:302021-05-19T04:08:27+5:30
उमरेड : कोविडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण होऊ नये. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे-खते आदींचा पुरवठा करण्यात यावा, आदी ...
उमरेड : कोविडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण होऊ नये. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे-खते आदींचा पुरवठा करण्यात यावा, आदी विषयांवर खरीप हंगामपूर्व आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात आ. राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली सदर आढावा सभा पार पडली. बँक कर्ज वितरित करताना कोणत्याही प्रकारची हयगय खपविली जाणार नाही, असा इशाराही पारवे यांनी दिला. १० गरजूंना ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. आत्रस्वामी कोडापे या कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, तहसीलदार प्रमोद कदम, खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, अश्विन उके, शिवदास कुकडकर, सुभाष मुळे, अरुण बालपांडे, संजय ठाकरे, नारायण देशमुख, रमेश किलनाके, जिल्हा परिषद सदस्य राजू सुटे, सुनिता ठाकरे, वंदना बालपांडे, पुष्कर डांगरे, दादाराव मांड्रस्कर, प्रियंका लोखंडे, जयश्री देशमुख, गीतांजली नागभीडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.