मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

By admin | Published: January 22, 2017 02:21 AM2017-01-22T02:21:10+5:302017-01-22T02:21:10+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे.

In the support of the child, 'MGO' came in | मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

Next

गरजूंना आरक्षण मिळते का तपासा ? : देशपातळीवर समिती नेमण्याची मागणी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे.
वैद्य यांचे वडील व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी त्यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरली आहे. मागासवर्गीय जाती व जमातींमधील अनेक जण अद्यापही गरीब असल्याने त्यांना आरक्षण असायला हवेच. मात्र ‘ओबीसी’ समाजातील खऱ्या गरजूंपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचत आहेत की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशपातळीवर समिती नेमण्याची आवश्यकता असल्याचे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल, असे वक्तव्य डॉ.मनमोहन वैद्य यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ‘यू टर्न’ घेत संघ आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून टीका सुरू झाली तर भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले.

संघाने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, मा.गो. वैद्य यांच्या मागणीसंदर्भात संघाने मात्र ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. संबंधित वक्तव्य हे मा.गो. वैद्य यांचे वैयक्तिक मत आहे. संघ त्या मताशी सहमत नाही. आरक्षण सुरूच राहायला हवे व त्याची अंमलबजावणी पूर्णपणे व्हायलाच हवी, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी स्पष्ट केले. संघ आरक्षणविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात आहे. याची आम्ही निंदा करतो, असेदेखील ते म्हणाले.

 

Web Title: In the support of the child, 'MGO' came in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.