शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जोशींना साथ द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:07+5:302020-11-29T04:05:07+5:30

नागपूर : संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. ते ...

Support Joshi to solve education problems () | शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जोशींना साथ द्या ()

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जोशींना साथ द्या ()

googlenewsNext

नागपूर : संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. ते विधान परिषदेत पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून आल्यास त्यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात आणखी उत्तम कार्य करता येईल. पदवीधर आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यास गती देण्यासाठी संदीप जोशी यांना साथ द्या, असे आवाहन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी पदवीधर मतदारांना केले.

भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या उत्तर आणि पूर्व नागपूरमधील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. शनिवारी महापौर संदीप जोशी यांनी उत्तर आणि नागपुरातील विविध भागात संपर्क दौरा केला. दौऱ्यामध्ये शिक्षक आ. नागो गाणार यांच्यासह आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, माजी आ. डॉ. मिलिंद माने, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र बोरकर, नगरसेवक मनोज चापले, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष हरीश बाखरू, चेअरमन डॉ. विंकी रुघवानी, महासचिव आय.पी. केशवानी, नवनीतसिंग तुली, भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष संजय चौधरी, प्रभाकरराव येवले, सिंधू महाविद्यालयाचे प्राचार्य कसबेकर, खोरिपचे नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे, भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, सुभाष पारधी, अशोकजी मेंढे, रमेशजी फुले, नगरसेवक गोपीचंद कुमरे, नगरसेविका निरंजना पाटील, दुर्गा हत्तीठेले, ज्येष्ठ नेते घनश्यामदास कुकरेजा, रूपचंदानी, क्रिपा लालवानी, दीपाताई लालवानी, अशोकजी लालवानी, नगरसेविका सुषमा चौधरी, नगरसेविका प्रमिला मंथरानी, सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वीणा बजाज, डिम्पी बजाज आदी उपस्थित होते.

संदीप जोशी यांचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने, ते लहानपणापासून शिक्षकांचे प्रश्न पाहून आहेत. त्यांना पदवीधरांच्याही प्रश्नांची जाण आहेच. त्यामुळे पदवीधरांनी कर्तृत्व पाहून संदीप जोशींना साथ द्यावी, असेही आवाहन आ. गाणार यांनी केले.

Web Title: Support Joshi to solve education problems ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.