पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी साथ द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:01+5:302020-11-22T09:29:01+5:30

रामदास तडस : संदीप जोशी यांच्यासह संपर्क दौरा नागपूर : महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भावर अन्याय होत आहे. या अन्यायाविरूद्धही ...

Support to make graduates' voices heard () | पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी साथ द्या ()

पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी साथ द्या ()

Next

रामदास तडस : संदीप जोशी यांच्यासह संपर्क दौरा

नागपूर : महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भावर अन्याय होत आहे. या अन्यायाविरूद्धही संघर्ष करण्यासाठी तसेच तरुणांचे, पदवीधरांचे, बेरोजगारांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांना साथ द्या, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.

खा. रामदास तडस यांनी महापौर संदीप जोशी यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.), आष्टी, आर्वी, पुलगाव, देवळी येथे संपर्क दौरा केला. यावेळी खा. तडस म्हणाले, पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित, जाणकार, अभ्यासू लोकांचा मतदारसंघ आहे. पक्षाचा गड राहिलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याची जबाबदारी आता पक्षाने नागपूरचे महापौर जोशी यांच्यावर सोपविली आहे. जोशी हे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना विभागातील प्रत्येक प्रश्नांना न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप जोशी यांनी कारंजा एमआयडीसी प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी आ. दादाराव केचे, भाजपचे वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, संदीप काळे, भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरुण पाठक, सुनील गपाट, कमल गोलधरीया, शिरीष भांगे, मुकुंद बारंगे, कमलाकर निभोरकर, आष्टी पंचायत समिती सदस्य रेखाताई मतले, सुरेश खवशी, चक्रधर डोंगरे, संजय कदम, आर्वी नगराध्यक्ष विनय देशपांडे, सभापती हणमंतराव चरडे, भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, पुलगाव नगराध्यक्ष शीतल घाटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण परिषदेचे ज्येष्ठ सदस्य बाबाराव देशमुख, राजीव जयस्वाल, राजीव बत्रा, मंगेश झाडे, दीपक फुलकरी, सुनीता राऊत, किशोर भवाडकर, संजय गाथे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Support to make graduates' voices heard ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.