तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:24+5:302021-06-17T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला ...

Supporter of Taliban militants arrested | तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. त्याच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीची जखम (व्रण) दिसून आल्याने तसेच तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. महत्त्वाचे म्हणजे, नूरचा मतिन नामक साथीदार अचानक फरार झाल्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाले आहे. त्याचमुळे तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे नाव असलेला एक अफगाणी नागरिक दिघोरी परिसरात राहतो. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूर मोहम्मदवर नजर ठेवली. सोशल मीडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूर मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला असल्याचे उघड झाले. नूर मोहम्मदच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण (व्रण) आहे. त्याच्या मोबाइलची पोलिसांनी तपासणी केली असता तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.

---

मतिन फरार, संशय अधिक घट्ट

नूर मोहम्मद येथे मतिन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर मोहम्मद ज्या गावात राहत होता, ते गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. त्याच्या कुटुंबात तिकडे आईवडील आणि दोन भाऊ होते. त्यातील आईवडील आणि एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच मतिन फरार झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आहे. हे दोघे नुसते तालिबानी समर्थक आहेत की तालिबानी अतिरेकी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

----

मतिन पळाला आसामकडे

विशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतिनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. त्यातून त्याने बनावट आधारकार्डसह अनेक कागदपत्रे जमविली. मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फरार असलेल्या मतिनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. मतिन आसाम, मेघालयकडे पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय असून, त्या राज्यातील तपास यंत्रणांना तशी माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.

----

रेकीचा संशय, तपास यंत्रणा सरसावल्या

नागपूर शहर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. येथे यापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर, तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर मोहम्मद आणि मतिनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे. त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले. नूरकडून कसलेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही. मात्र, एक व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये सापडला. त्यामुळे तो हिंसक वृत्तीचा असल्याचे लक्षात येते. या संबंधाने एटीएस, आयबीसह विविध तपास यंत्रणांनी नूर मोहम्मदची चाैकशी चालविली आहे.

----

Web Title: Supporter of Taliban militants arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.