सोयामिल्कसह देशी वाणांचे पाठीराखे डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 PM2021-07-27T16:42:30+5:302021-07-27T16:42:55+5:30

Nagpur News तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी अवघे आयुष्य वेचलेले, लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी यासाठी तब्बल चाळीस वर्षे लढा दिलेले व नागपुरातील नागरिकांना सोयामिल्कची सवय लावणारे, आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी निधन झाले.

Supporters of native varieties including soymilk, Dr. Shantilal Kothari passed away | सोयामिल्कसह देशी वाणांचे पाठीराखे डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

सोयामिल्कसह देशी वाणांचे पाठीराखे डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी अवघे आयुष्य वेचलेले, लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी यासाठी तब्बल चाळीस वर्षे लढा दिलेले व नागपुरातील नागरिकांना सोयामिल्कची सवय लावणारे, आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी निधन झाले.
अ‍ॅकेडमी आॅफ न्यूट्रीशन इम्प्रूव्हमेंट या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोठारी यांनी गेली चाळीस दशके योग्य आहाराबाबत जनजागरणाचे काम अविरत केले. या कार्यात त्यांनी अनेकदा सरकारशी मोठे लढे दिले. त्यात लाखोळी डाळीवरील बंदी उठवण्याचा लढा त्यांनी चाळीस वर्षे दिला व ते त्यात यशस्वी झाले होते.

 

Web Title: Supporters of native varieties including soymilk, Dr. Shantilal Kothari passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू