सर्वोच्च न्यायालय : युग चांडक खून प्रकरणावर जानेवारीत अंतिम सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 09:05 PM2018-11-15T21:05:59+5:302018-11-15T21:07:37+5:30

सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठेवून घेतले.

Supreme Court: Last hear in January on the murder of Yug Chandak murder case | सर्वोच्च न्यायालय : युग चांडक खून प्रकरणावर जानेवारीत अंतिम सुनावणी

सर्वोच्च न्यायालय : युग चांडक खून प्रकरणावर जानेवारीत अंतिम सुनावणी

Next
ठळक मुद्देदोन आरोपींना झालीय फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठेवून घेतले.
राजेश धन्नालाल दवारे (२३) व अरविंद अभिलाष सिंग (२७) अशी प्रकरणातील आरोपींची नावे असून राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशी व अन्य शिक्षा कायम ठेवल्यामुळे आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच, सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपींचे अपील फेटाळले. सर्वोच्च न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. गौरव अग्रवाल तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी कामकाज पाहिले.
असे आहे प्रकरण
आरोपी राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. एक दिवस राजेशने युगला थापड मारली होती. परिणामी, डॉ. चांडक राजेशवर रागावले होते. याशिवाय राजेश रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसुल करीत होता. यासंदर्भात अनेक रुग्णांनी डॉ. चांडक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात होता. त्यातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगला दुचाकीवर बसवून कोराडी रोडने निर्जण ठिकाणी नेले व तेथे त्याची हत्या केली.

Web Title: Supreme Court: Last hear in January on the murder of Yug Chandak murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.